आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
मोबाईल न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथील कारंजा घाडगे येथे आज पहाटेच्या दरम्यान चार दुकानाला अचानक भीषण आग लागली. या आगीची भीषणता यावरून दिसून येत होती की परिसरात धुलाचे लाट निघत होते. आग कशी लागली याचे कारण अद्याप पर्यंत कळू शकले नाही. या आगीत जवळपास 20 लाखाचे नुकसान झाले आहे.
शहरातील मुख्य मार्केट मधील नगर पंचायतच्या माजी नगरसेवकांच्या मोबाईलच्या दुकानात अचानक आग लागली. दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याचे विस लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
चार दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. याठिकाणी मोबाईलचे दुकान, पान टपरी, स्वीट मार्ट दुकान अशी चार दुकाने आगीत जाळून खाग झाली आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र कळू शकले नाही. पहाटेपासून लागलेल्या आगीत सकाळी साडे सात वाजेपर्यंत नागरिकांनी आग विझविण्याचा आटोक्यात प्रयत्न केला. यावरून आगीचे रौद्ररूप लक्षात येते. चार दुकानात आग लागल्याचे समजताच नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. यावेळी अनेक नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आग आटोक्यात येत नसल्याने आष्टी वरून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी चार दुकाने जळून खाक झाली होती. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य सुरू होते . घटनास्थळी कारंजा पोलीस दाखल झाले होते.
स्थानिक कारंजा नागरी समस्या संघर्ष समिती मागील तीन वर्षापासून नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदने, स्मरणपत्रे व आंदोलने करून अग्निशमन गाडीची मागणी करीत आहे. २०२० पासून कारंजा नगरपंचायत नागरिकांकडून अग्निशमन कर आकारीत आहे. परंतु नगरपंचायत कडे मात्र आग विझविण्याकरीता स्वतःची अग्निशमन गाडी उपलब्ध नाही.
तीन महिन्यातच आगीची दुसरी घटना घडलेली आहे. दिवाळीमध्ये नगरपंचायत च्या कचरा डेपोला आग लागली होती. नगरपंचायत प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून अग्निशमन यंत्रणेला प्राथमिकता द्यावी असे नागरी समितीने म्हटले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…