सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सोलापूर:- येथून एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. सर्वत्र तीळ संक्रांतीच्या उत्सव साजरा होत असताना एका बापाने आपल्याच पोटच्या मुलाचा निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जन्मदात्या नराधम बापाने आपल्या मुलाला मुलाच्या कोल्डड्रिंक मधून विष पाजून त्याचं आयुष्याचा निर्दय पणे अंत केला. विजय बट्टू असे आरोपीचे बापाचे नाव असून त्यानी पोटच्या मुलाला संपवलं. त्यामागचं कारण ऐकून तर मोठा धक्का बसेल.
शाळेतून मुलाच्या सतत तक्रारी यायच्या, त्याचा खोडकरपणा, अभ्यास न करणे, सतत मोबाईल पाहणे, या त्याच्या चुकीच्या सवयींमुळे पित्याच्या मनात राग होता आणि त्यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.अखेर 15 दिवसांनी त्यांनी या गुन्ह्याची स्वतःच कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
काय आहे ही घटना: प्राप्त माहितीनुसार, सोलापूर-तुळजापूर हायवे रोडवरील सर्विस रोडलगत नाल्याजवळ एका लहान मुलगा पडलेला आढळला होता. संबंधित माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून तत्काळ त्या मुलाला, शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र तेथे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होत. पोलिसांनी तपास केला असता त्या मुलाची ओळख पटली आणि तो भवानी पेठ, सोलापूर येथील रहिवासी असल्याचे समजले.
पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असता, मृत मुलगा हा घटनेच्या दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर पडला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत त्याचे घर ते जिथे त्याचा मृतदेह सापडला, तिथपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याचे वडीलच त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी विजय यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा हा शाळेत तसेच घरीही, शेजारी अनेकांच्या खोड्या काढायचा, त्यामुळे त्याच्याबद्दल लोक सतत तक्रारी घेऊन यायचे. तसेच तो अभ्यास करायचा नाही, सतत मोबाईल पहायचा. याचाही आरोपीला खूप राग यायचा. याच रागातून ते संक्रांतीच्या दिवशी मुलाला घएऊन बाहेर पडले आणि मोटार सायकलवर बसवून निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेले. तेथे त्यांनी कोल्डड्रिंकमध्ये सोडीयम नायट्रेटची विषारी पावडर मिसळली आणि ते मुलाला प्यायला दिले. ज्यामुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…