तिरुपती नल्लाला राजुरा तालुका प्रतिनिधि मोबा.9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला जी सितारमन यांनी सन 2024-25 करीता संसदेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून देशाला विकसीत राष्ट्रांच्या रांगेत आणण्याचे ध्येय अंतर्भूत असून हे अर्थसंकल्प गरीब, महिला, युवक व बळीराजाला समर्पित असून या अर्थसंकल्पाद्वारे माननिय मोदी सरकारच्या ‘सर्वांची साथ, सर्वांचा विकास व सर्वांचा विश्वास’ या धोरणाशी सुसंगत असल्याची प्रतिकीया राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.
देशातील पायाभूत सुविधांसाठी 11.11 लक्ष कोटींची तरतूद विकासाला नवी दिशा देणारी ठरेल 7 लक्ष रूपये वार्षिक उत्पन्नावर करदात्यांना करसुट देण्यात आली असल्याने मोठ्या संख्येतील लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. गेल्या 10 वर्षात सरकारने 390 कृषी विद्यापीठ, 7 आयआयटी, 7 आयआयएम व 3 हजारहून अधिक आयटीआय संस्थांची उभारणी केली. जीएसटीमुळे एक देश एक बाजार ही संकल्पना यशस्वीपणे साकार करण्यात सरकार यशस्वी ठरले. महिला सशक्तीकरण, ग्रामिण महिलांना 70 टक्के घरे, शेती क्षेत्रातून 3 लक्ष कोटीचा व्यापार, 80 कोटी लोकांना मोफत शिधा देण्यात सरकार सफल झाले आहे.
युवकांना सुवर्णकाळ लाभण्यासाठी 50 वर्षां साठीच्या बिनव्याजी कर्ज योजनेसाठी 1 लक्ष कोटीची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यास 517 नवीन विमानमार्ग प्रस्तावित केले आहे. नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना 9 ते 14 वर्षीय मुलींसाठी गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधासाठी लस, सोलर पॅनलद्वारे 1 कोटी घरांना महिनाभरात 300 युनिट मोफत विज पुरविण्याचे धोरण, आशा सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ, उच्च शिक्षणात महिलांचा टक्का वाढविण्याचे धोरण, मुद्रा योजनेतून महिला उद्योजकांना 30 कोटी कर्ज वितरण, देशात गोदामांची उभारणी, किसान संपदा योजनेतून 38 लक्ष शेतकऱ्यांना लाभ देण्याचे धोरण, 5 वर्षात ग्रामिण क्षेत्रात 2 कोटी घरांची उभारणी करण्याचा मनोदय सरकारने या अर्थसंकल्पातून व्यक्त केला असून अमृत कालात शास्वत व सर्वसमावेशक विकास, उत्पादकतेत वृध्दी संसाधनात गुंतवणूक हे सरकारचे धोरण शक्तीशाली अर्थव्यवस्थेला चालना देणारे असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…