निखिल पिदुरकर प्रतीनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर येथे आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांचे अधिकाऱ्यांपुढे सवाल उपस्थित केला आहे कि, तीन-चार महिन्या पासून बल्लारपूर शहरात घर बांधकामासाठी मुबलक प्रमाणात वाळू मिळत नाही आहे, अनेक नागरिकांच्या घरांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत दिसून येत आहे. घराचं बांधकाम करणारे मालक आणि बांधकाम कंत्राटदार व मजूर या वाळू पुरवठाच्या समस्येने त्रस्त आहेत. गावात कायदेशीर वाळू उपलब्ध नसून अवैध वाळू मात्र मुबलक प्रमाणात मुबलक दरात उपलब्ध कशी होत आहे?, असा प्रश्न देखील पुप्पलवार यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
शहरात आजकाल एक टाटा एस भरून अवैध वाळू तीन ते चार हजार रुपया दरात विक्री केली जात आहे. बल्लारपूर शहरातील जनते समोर “मरता क्या ना करता” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, तरी बल्लारपूर शहरातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
बांधकामासाठी जनतेला कायदेशीर वाळू उपलब्ध करून देण्याची तरतूद कोण करणार याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? शहरात अवैध वाळू विक्रीला कोण प्रोत्साहन देत आहे? शहरात अवैध वाळू कोठून येत आहे? कोणाद्वारे याचा पुरवठा केला जात आहे , हे अधिकाऱ्यांना माहीत नाही का? आज प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात हा प्रश्न पडतो आहे. अशाप्रकारे शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील रेती समस्येबाबत आपचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…