धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिरोच्या येथे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरा.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोच्या:- स्नेह संमेलन हे केवळ नाट्य, नृत्य याचा आविष्कार न राहता ते विचारांचे अंतर्मुख करणारे संमेलन बनावे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे असे धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी स्नेह संमेलनात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. ते पुढे बोलताना ते म्हणाले शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात एकाग्रतेने आणी जिद्दीने कठोर परिश्रम घेतल्यास यशाच्या शिखरा पर्यत पोहचण्यास कोणीही थांबवू शकत नाही असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिरोच्या येथे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी विद्यार्थ्यांनी नाट्य व नृत्याच मनमोहक, आकर्षक सादरीकरण केलं.
या कार्यक्रमाचे उदघाटक व अध्यक्ष म्हणून धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून राजमाता राणी रुक्मिणी देवी, युवा नेते अवधेराव बाबा आत्राम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, शहरध्यक्ष दिलीप सेनिगरापू, जेष्ठ नेते रंगू बापु, भाजप प्रकोष्ठ संतोष पडलवार,पत्रकार इरफान, शाम बेंजनवार हे होते.
या स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य तगरे सर यांनी केले तर सूत्र संचालन प्यारेलाल उमरे आणि आभार रमण कोमेरा यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…