प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.2:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘जाणता राजा’ महानाटयाचा प्रयोग होणार आहे.
‘जाणता राजा’ महानाटयाचा प्रयोग वर्धेत दि. 6 ते 8 फेब्रुवारी या कालवाधीत स्वावलंबी मैदान, रामनगर येथे आयोजित करण्यात आले असून या महानाट्याच्या तयारीला वेग आला आहे. या महानाट्याच्या तयारीचा वर्धेचे आमदार पंकज भोयर व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, तहसीलदार रमेश कोळपे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
‘जाणता राजा’ महानाट्यात प्रवेश निशुल्क असल्यामुळे नागरिकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. दिव्यांग बांधवांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात यावी. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पार्किंगचे पोलिस विभागाने नियोजन करावे. कार्यक्रमामध्ये स्वयंसेवक, होमगार्ड आदींची मदत घ्यावी, अशा सूचना यावेळी आमदार पंकज भोयर यांनी दिल्या.
तीन दिवशीय महानाट्याचे उद्घाटन दि.6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 स्वावलंबी विद्यालय मैदान, रामनगर येथे होईल. याचे उद्घाटन कार्यक्रमास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा.रामदास तडस, आ.रामदास आंबटकर, आ.अभिजित वंजारी, आ.सुधाकर आडबाले, आ.रणजित कांबळे, आ.दादाराव केचे, आ.समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले उपस्थित राहणार आहे.
शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेका पर्यंतच्या रोमांचकारी प्रसंग ‘जाणता राजा ‘ मध्ये दाखविण्यात येणार आहे. दररोज सायंकाळी 5.30 वाजता नंतर या प्रयोगाला सुरुवात होईल. नागरिकांना प्रवेश मोफत असून प्रवेशिकेद्वारे प्रवेश मिळणार आहे. प्रवेशिका नवीन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नगर परिषद कार्यालयामध्ये मिळणार आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नागरिकांनी सहकुटुंब प्रयोग बघावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…