तब्बल 12 कोटी रुपयांच्या निधीतून होणार रस्त्याची विकास कामे.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुका मुख्यालयातील चारही बाजुंनी जाणारे रस्ते गुळगुळीत करण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणली असून त्यातील काही कामे प्रगतीपथावर आहेत तर उर्वरित काही कामांचे नुकतेच त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे अहेरी मुख्यालयात ये-जा करणाऱ्यांची मोठी अडचण दूर होणार आहे.
पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली होती. त्यात अहेरी उपविभागातील बरेच रस्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अहेरी तालुका मुख्यालयातील चारही बाजूच्या रस्त्यांची अक्षरशः वाट लागली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठी निधी खेचून आणली मात्र, टेंडर प्रोसेस होऊनही कंत्राटदार दिरंगाई करत होते. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री आत्राम यांनी चांगलेच फैलावर घेतले. त्यांनतर बरेच रस्त्याचे काम प्रगती पथावर आहेत. प्राणहिता ते अहेरी आणि विठ्ठयल रुखमाई मंदिर ते देवलमरी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी सुद्धा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विशेष प्रयत्न करून तब्बल 12 कोटी रुपयांची निधी खेचून आणला.
नुकतेच या कामांचे भूमिपूजन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले असून त्यात विठ्ठयल रुखमाई मंदिर ते पुढे 4.50 कोटींच्या निधीतून 3 किलोमीटरचे काम केले जाणार आहे. पुढे गड अहेरी ते समोर 3 कोटी रुपयांच्या निधीतून 2 किलोमीटर तर प्राणहिता ते अहेरी पर्यंत 4.50 कोटी रुपयांच्या निधीतून 3 किलोमीटरचे काम केले जाणार आहे.
या भूमिपूजनप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद दोंतुलवार, उपाध्यक्ष कन्हय्यालाल रोहरा, जेष्ठ नागरिक मलरेड्डी बोम्मावार, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत आईंचवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, राकॉ चे तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, नगरसेवक अमोल मुक्कावार, पत्रकार सुरेंद्र अलोने, आदित्य जक्कोजवार आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आर के पारेलवार, सहाय्यक अभियंता श्रेणी -२ धम्मदीप रामटेके, कनिष्ठ अभियंता नागेश आडेपुवार उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…