मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- स्थानिक शहरातील प्रभाग क्र.15 येथील पापय्या मंचार्ला यांची मुलगी कु.नागमनी पापय्या मंचार्ला वय-19 वर्षे ही दीर्घ आजाराने ग्रस्त होती.त्यामुळे तिला चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले पण दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान तीचा मृत्यू झाला. पापय्या मंचार्ला याच्या कुटुंबाची आर्थिक परीस्थिती अत्यंत कमजोर असल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज होती.
ही माहिती स्थानिक कार्यकर्ते यांनी अहेरी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना दिली. यावेळी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी क्षणाचाही विलंब करता पापय्या मंचार्ला यांच्या घरी भेट देऊन सांत्वन करत त्यांच्या कुटूंबाला 10 हजार रुपये आर्थिक मदत केली. मी तुमच्या कुटुंबातील सुख दुःखात सोबत आहो, काही समोर अडचणी असल्यास मी सदैव सहकार्य करण्यास तत्पर राहीन असे आश्वासन यावेळी पापय्या मंचार्ला यांच्या कुटूंबाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सिरोच्या तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मंचार्ला कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…