महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्या कुटुंब संवाद दौरा सुरू केला आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी रविवारी 4 फेब्रुवारी रोजी कोकण येथील कणकवली येथील नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील जनतेला आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाला साथ देण्याची विनंती केली. माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी कणकवलीच्या सभेत बोलताना जून २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या फूटीवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, माझे आमदार फुटत आहेत याची मला कल्पना होती. परंतु, हे नासके आंबे मला माझ्या पेटीत नको होते. त्यामुळे मी ते जाऊ दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपल्या भगव्याची प्रतिष्ठापना करायची आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या तख्तावरही आपला भगवा फडकवायचा आहे. असं केल्यास तो आपल्यासाठी यशाचा एक क्षण असेल. असे हे क्षण आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून मागून घेत आहोत. मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे. मी मुख्यमंत्री झालो होतो. त्यावेळी नाईलाजाने मला ते पद स्वीकारावं लागलं होतं. कारण माझे परतीचे दोर कापले गेले होते.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्रिपद सोडताना मी जराही विचार केला नाही की हे पद कसं सोडू… मला जर त्या पदाला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो. मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटतायत ते… त्यांना पकडून मी हॉटेलात टाकू शकलो नसतो का? त्या मिंद्याचं काय… त्याला कुठूनही धरून, खेचून आणला असता… पण मला हे सडके आंबे नको होते. आंब्याच्या पेटीत एक जरी नासका आंबा असेल तर अख्खी पेटी नासते. म्हणून मी सर्वात आधी नासके आंबे उचलून फेकून दिले.
माजी मुख्यमंत्री म्हणाले, मी माझ्या पेटीतले नासके आंबे फेकून दिले आहेत आणि आता आपल्याबरोबर हे मर्द आहेत. मर्दासारखे मर्द आपल्यासाठी उभे आहेत. हे मर्द जोपर्यंत माझ्याबरोबर आहेत तोवर मला कोणाचीही परवा नाही. मी लढायला उभा आहे, फक्त तुम्ही (जनता) माझी साथ देणार की नाही? या कणकवली मतदारसंघात तुम्ही मला विजय देणार आहात की नाही? या मतदार संघातसुद्धा आपला जो उमेदवार असेल त्याला तुम्हाला विजयी करावंच लागेल. ही सगळी कोकणची किनारपट्टी आपल्याला भगवी करायची आहे. इथे आपले खासदार तर आहेतच, आता आणखी काही आमदार निवडून आणायचे आहेत.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…