पल्लवी मेश्राम, उपसंपादक (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाजाने सर्व आंबेडकरी चळवळीला आपल्या प्रबोधनात्मक कव्वालीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध आणि सर्व महापूरूर्षांच्या मानवमुक्तीचे कार्य रुजविणाऱ्या आघाडीच्या गायका किरण पाटणकर याचे आज दुःखद निधन झाले. त्या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या.
आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या लाेकप्रिय गायक नागाेराव पाटणकर यांचा त्या कन्या होत्या. त्यांनी ‘भीमराज की बेटी’ अशी स्वत:ची ओळख निर्माण करत आंबेडकरी चळवळीत आपल्या भारदस्त गीताच्या माध्यमातून आंबेडकर चळवळ गावागावात पोहचवली अशा प्रसिद्ध गायका किरण पाटणकर यांचे आज साेमवारी दीर्घ आजाराने बेझनबाग येथील निवासस्थानी त्यानी 62 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मुलगा व बराच माेठा आप्तपरिवार आहे.
किरण पाटणकर यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे झाला होता. त्यानंतर त्यांचे कुटुंब नागपूरला स्थानांतरित झाले. त्यांचे वडील नागाेराव पाटणकर हे त्याकाळात आंबेडकरी चळवळीतील प्रबोधनात्मक कव्वाली आघाडीचे गायक होते. आपल्या वडिलांचा पावलावर पाऊल टाकत भाऊ प्रकाशनाथ पाटणकर आणि त्या पाठाेपाठ किरण यांनीही गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केले. किरण यांना बालपणापासूनच गायनाची आवड हाेती व वेगवेगळ्या कार्यक्रमांतून त्यांची कला बहरत हाेती. लाेकगायक व कव्वाल म्हणून या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अल्पावधीत त्यांची ओळख निर्माण झाली.
त्या काळात गावाेगावी हाेणाऱ्या शंकरपट, मंडई, मेळावे अशा कार्यक्रमांमधून त्यांच्या कव्वालीचे सामने बहारत होते. आंबेडकरी जलशांमधून किरण पाटणकरांचा आवाज घुमत गेला. आनंद शिंदे, जानीबाबू, मज्जिद शाेला अशा त्या काळातील सर्व माेठ्या गायकांसाेबत किरण यांचा दुय्यम कव्वालीच्या सामन्यांची लाेक आतुरतेने वाट पाहायचे. अशा कार्यक्रमात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धांच्या गीतांची फर्माईश ही ठरलेली असायची. किरण पाटणकर यांनी हजारो भीमगीते गायली.
दरवर्षी दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या धम्मदीक्षा साेहळ्यात किरण पाटणकर यांच्या गीतांना आजही माेठी मागणी असते. गायनातून लाेकप्रियतेचे शिखर पाहिलेल्या किरण पाटणकरांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा भारदस्त आवाज हरपल्याची प्रतिक्रिया यांनी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी दिली.
किरण पाटणकर यांनी लाेकसभेची निवडणूक लढविली होती त्या नागपुर महानगर पालिकेच्या बहुजन समाज पक्षाकडून नगरसेविका हाेत्या. 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी रामटेक मतदार संघातून अनुक्रमे बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी कडून लाेकसभेची निवडणूकही लढविली हाेती.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…