गडचिरोली जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनातून मागणी.
मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी :- तालुक्यातील देवलमरी येथे महाराष्ट्र बँकेची शाखा परत आणण्याकरीता जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
देवलमरी येथे १९८९ सलापासून महाराष्ट्र बँकेची शाखा सुरू होती. परंतु सध्या स्थितीत येथे बँक कार्यरत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना व इतर सर्व नागरिकांना, श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या वृद्ध लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शाखेत ग्रामपंचायत देवलगरी, इंदाराम, वट्रा, आवलमरी व तिमरम यांचे विविध शासकीय योजनेचे खाते होते. तसेच ग्रामपंचायत अंतर्गत महिला बचत गटाचे खाते सुरू होते व या शाखेत श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजना रमाई घरकुल, शबरी घरकुल, आदिम जमातीचे घरकुल, इंदिरा आवास घरकुल लाभार्थीचे खाते या बँकेत होते. शेतकरी वर्ग या शाखेतून पीक कर्ज घेत होते व गावकरी लोकांचे खाते होते. देवलमरी येथे बँक असल्यामुळे पाचही ग्रामपंचायतीचे नागरीक व महिला बचत गट या शाखेतुन आर्थिक देवाण-घेवाण करत होते परंतु सदया स्थितीत महाराष्ट्र बँकेची शाखा अहेरी येथे स्थलांतर करण्यात आल्यामुळे नागरिकाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काहीवेळेस अहेरीला प्रवास करायला परिवहन मंडळाचे बस सेवा उपलब्ध नसल्याने सुद्धा प्रवासाचा त्रास भोगावा लागत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी देवलमरी येथील महाराष्ट्र बँकेची शाखा परत सुरू करण्यास मदत करावी अशी मागणी नागरिकांनी जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे केली आहे..!!
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…