पल्लवी मेश्राम उपसंपादक (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने जोरदार झटका देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव तसेच पक्षाचे चिन्ह असलेले घड्याळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिले त्यामुळे शरद पवार गटाकडून निषेध करण्यात येत आहे. आज नागपुर शहरातील व्हेरायटी चौकात जोरदार निदर्शने करीत नारेबाजी करण्यात आली.
शरद पवार गटाचे नागपुर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत यावेळी निवडणूक आयोगाचा निषेध नोंदविला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. एवढी वर्षे त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले व आता निवडणूक आयोग केंद्र सरकार व भाजपच्या इशाऱ्यावर काम करीत असून पक्षाचे नाव व चिन्ह हिसकावण्याचे काम करीत असल्याचा आरोप यावेळी पेठे यांनी केला.
या आंदोलनात नागपुर ग्रामीण अध्यक्ष राजु राऊत, वेदप्रकाश आर्य, अविनाश गोतमारे, प्रवीण कुंटे, जानबाजी मस्के, वर्षा शामकुले, पंकज ठाकरे, श्रीकांत घोगरे, रेखा कुपाले, संतोष सिंह, शिव भेंडे, महेंद्र भांगे, राविनिष पांडे, राजा बेग,अरशद सिद्दिकी, मोरेश्वर जाधव, राजू सिंग चव्हाण, प्रशांत बनकर, तनुज चौबे, , अश्विन जवेरी, सुनील लांजेवार, आशुतोष बेलेकर, रिजवान अंसारी, प्रकाश लिखाणकर, धनंजय देशमुख, नंदू माटे, राजा खान,विनोद कावळे, लीना पाटील, शेखर पाटील, नागेश वानखेडे, विनय मुदलियार,अर्चना वावू, संदीप डोरलीकर, अमित श्रीवास्तव, विजय गावंडे, अजहर पटेल संजय दापोळकर, सारंग साखरे, नितीन बाकडे, आकाश चिमणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…