संविधान विरोधी केंद्र व राज्य सरकारला येणाऱ्या निवडणुकांमध्ये घरी बसावा: रमेशचंद्र बंग. भव्य मोर्चा काढत रमेशचंद्र बंग यांनी भरली निवडणुकीनंची हुंकार.
देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका (नागपूर) प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, महिला भगिनी सुरक्षित नाही अशे अनेक ज्वलंत प्रश्न असतांना केंद्रातील व राज्यातील सरकार मात्र विरोधी पक्षांना फोडणे व समाजा समाजात तेढ निर्माण करणे यात व्यस्त आहे. सरकार लोकशाही आणि संविधान मिटवायला निघालं आहे, या सरकारला सामान्य जनतेशी काही घेणं देण नाही. अश्या बेजबाबदार सरकारला येण्याऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये घरी बसवा.
देशात वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल डिझेलचे गगनाला भीडलेले भाव, शेतकऱ्यांच्या कापूस तूर, सोयाबीन आदी मालाला हमीभाव, वन हक्क जमिनीचा प्रश्न, झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे पट्टे युवकांना रोजगार, हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील बंद पडत चाललेली कारखानदारी त्यामुळे कामगारांना उपासमारीला समोर जावं लागत आहे. अशा जनसामान्यांच्या विविध मागण्यांकरिता व विविध प्रश्नांना घेऊन शरद पवार विचार मंचाच्या बॅनर खाली हिंगणा येथे माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे (पाटील), माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्च्याचे हिंगणा येथील तहसील कार्यालय परिसरात सभेत रूपांतर झाले.
यावेळी सभेला संबोधताना बंग यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला. यावेळी हिंगणा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विजयी घोडमारे पाटील, माजी आमदार प्रकाश गजभिये यांनीही सभेत बोलताना सरकारवर घणाघाती टीका केल्या तर जिल्हा परिषदेतील गटनेने दिनेश बंग यांनी शेतकऱ्यांच्या शेतपंपाना दिवसाची विज शासनाने द्यावी अशी आग्रही मागणी मांडली.
या मोर्च्याची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आले. यावेळी या मोर्च्यात कापूस, तूर यांना हमीभाव मिळावा व घरघुती वापराच्या गॅस सिलेंडरचे भाव कमी झाले पाहिजे याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बैल गाडीवर कापूस, तुरीचे पेढे, गॅस सिलेंडर ठेवण्यात आले होते त्या बैलगाडीचे सरथ्य दिनेश बंग यांनी केले. हा मोर्चा तहसील कार्यालय हिंगणा येथे आला असता मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावे उपविभागीय अधिकारी आकाश औतारे यांच्या मार्फत देण्यात आले.
यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे, माजी आमदार प्रकाश गजभिये,जिल्हाध्यक्ष राजू राऊत, हिंगणा विधानसभा अध्यक्ष प्रकाश नागपुरे, जिल्हा जि. प सदस्य दिनेश बंग, माजी सभापती उज्वला बोढारे, हिंगणा पंचायत समितीच्या सभापती सुषमा कावळे, तालुकाध्यक्ष योगेश सातपुते, नागपूर तालुकाध्यक्ष संजय कुंटे, जि.प सदस्य वृंदा नागपुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रश्मी कोटगुले, माजी उपसभापती उमेश राजपूत, शरद पवार विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष सौरभ बंग कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, वाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, राजेश जैस्वाल, सुरेंद्र मोरे, प्रमोद बंग, अमर जैन, संतोष नरवाडे, नागपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय चिकटे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्याम गोमासे, येजेंद्र ठाकूर, रोशन खाडे, पुरुषोत्तम डाखळे, लीलाधर दाभे,गोवर्धन प्रधान, सुशील दीक्षित, हनुमान दुधबळे, राजेंद्र गोतमारे, हिंगणा नप. गटनेते गुणवंत चामाटे, प स सदस्य सुनील बोंदाडे, राजेंद्र उईके, पौर्णिमा दीक्षित, अनुसया सोनवाणे, रुपाली खाडे,वानाडोंगरी शहराध्यक्ष हरिभाऊ रसाळ, वाडी शहराध्यक्ष वसंतराव ईखनकर, बुटीबोरी शहराध्यक्ष बालू सवाने, डिगडोह शहराध्यक्ष विजय मेश्राम, निलडोह शहराध्यक्ष संदीप नेहारे, प्रदीप कोटगुले, विलास वाघ, मुकेश ढोमणे, दिलीप सोनकुसळे, शारदा शिंगारे, शोभा माहुरे, मीना मेश्राम,अरुण देवतळे, रमेश सावरकर, सिराज शेटे, सुहास कोहाड, विठ्ठल हुलके, श्याम फलके, युसूफ पठाण, रामचंद्र टेकाटे, केशव डभारे, भगवान मिसाळ, रामभाऊ महाल्ले, प्रेमलाल चौधरी, प्रवीण खाडे, अनिल लोहकरे, मंगेश भांगे, शैलेश रॉय, विठ्ठल घोगडे, पांडुरंग लोळे, संकेत दीक्षित, मंगला उरकुडे, विजू भलावी, नारायन उईके, रेखा कळसकर, प्रेमलाल भलावी यांच्यासह गावा गावातील सरपंच, उपसरपंच, बाजार समितीचे संचालक, खरेदीविक्री संचालक, शेतकरी शेतमजूर, कामगार मोठ्या संखेने उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…