प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- लवकरच देशात लोकसभा निवडणुकीत बिगुल वाजणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला.
वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या मतदान झालेल्या मतदान यंत्रांची साठवणूक, त्याची सुरक्षा व त्याअनुषंगाने होणाऱ्या मतमोजणीकरीता भारतीय खाद्य निगम येथील तयार करण्यात येणाऱ्या सर्व यंत्रणेची आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी संयुक्तिकरित्या पाहणी केली. तसेच जिल्ह्यातील मतदान यंत्रे साठविण्यात आलेल्या वखार महामंडळाच्या गोडावून येथील सुरक्षा यंत्रणा व त्यादृष्टीने नेमण्यात आलेल्या सुरक्षेची सुध्दा पाहणी करण्यात आली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक सागर कवडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत, मतमोजणी यंत्रणेचे नोडल अधिकारी महेश मोकलकर आदी उपस्थित होते.
यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीकरीता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार होणाऱ्या विधानसभा स्तरावर प्रचार प्रसिध्दीकरीता मतदान यंत्रे पाठविण्यात आलेली आहेत. सदर मतदान यंत्रे गावोगावी जाऊन जनतेमध्ये मतदार जनजागृती व मतदान यंत्र हाताळणी कसे करावे याबाबत जागृती करीत आहे. त्याकरीता मतदान केंद्रावर ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्राच्या सुरक्षेबाबतचा आढावा उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार, ठाणेदार यांनी संयुक्तपणे घ्यावा, अशा सुचना निवडणूक आयोगाच्या आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत यांनी कळविले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…