मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातून एका महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. येथे काल संध्याकाळी काही सशस्त्र नक्षलवादी कॅडर कांकेर – नारायणपूर – गडचिरोली जाणाऱ्या त्रिकोणी रस्त्याच्या पॉइंटवरील वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिद्दूर गावात विध्वंसक कारवाया करण्यासाठी व नव्याने उघडलेल्या पोलीस स्टेशन वांगेतुरी आणि पो.म.के.गर्देवाडा या आउट पोस्टची रेकी करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून आहे.
अशी माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चार C-60 पार्ट्यांचा समावेश असलेले एक पथक सदर भागात शोध मोहिमेवर पाठवण्यात आले. सदर पथक हिद्दूर गावापूर्वी 500 मीटर अंतरावर असताना त्यांचेवर सुमारे 7.00 वाजताच्या सुमारास नक्षल्यांकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला त्याला गडचिरोली पोलीस दलाने प्रत्युत्तर दिल्यावर घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. परिसरात झडती घेतली असता – पिट्टू, स्फोटक साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनेल आणि नक्षल साहित्य इत्यादी मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले जात आहे
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…