महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाराष्ट्र:- पुण्यामध्ये निर्भय बनो कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पोलिस बंदोबंदात जात असतानाही प्राणघातक हल्ला करण्यात आला. भाजपकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर पत्रकार निखिल वागळे यांना निर्भय बनो कार्यक्रमासाठी पोहोचण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात आला. मात्र, कार्यक्रम पोहोचेपर्यंत पोलिस बंदोबस्त असतानाही चारवेळा गाडी फोडण्यात आली. इतकंच नव्हे, तर शाईफेक तसेच अंडीफेक करण्यात आली. त्यामुळे काही काळ कार्यक्रम स्थिकानी गोंधळ उडाला होता.
पुण्यात राष्ट्र सेवा दल साने गुरुजी स्मारक येथे निर्भय बनो कार्यक्रमाला भाजपने जोरदार विरोधनंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करत शाई फेकण्यात आली. तरीसुद्धा ते निर्भय बनो या कार्यक्रमात ते गेले आणि विरोधकासह राज्य आणि भाजप सरकार जोरदार टीकास्त्र सोडत, महाराष्ट्राचा यूपी, बिहार झाला आहे असे प्रतिपादन केले.
त्यांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्र विकायला काढला आहे. आज राष्ट्र सेवा दल साने गुरुजी स्मारक येथे आयोजित ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमात वकील असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
निखिल वागळेंच्या गाडीवर अंडीफेक, शाईफेक
आज राष्ट्र सेवा दल साने गुरुजी स्मारक येथे आयोजित ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने घोषणाबाजी केली. महाराष्ट्रातील पुरोगामी कार्यकर्त्यांकडून राज्यभरात “निर्भय बनो” हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यात ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, अमोल पालेकर, कुमार नागे, रेश्मा रामचंद्र, अश्विनी सातव ढोके वक्ते म्हणून आहेत. या कार्यक्रमाला निघालेल्या निखील वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेक कऱण्यात आली, तसेच ही गाडी फोडण्यात आली. तसेच, त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनादेखील मारहाण करण्यात आली. निखिल वागळेंच्या गाडीवर अंडीफेक, शाईफेक, दगडफेक करण्यात आली. त्याचबरोबर भाजपने या कार्यक्रमाअगोदरच याविरोधात निदर्शने करीत कार्यक्रम होऊ देणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर ही दगडफेक, शाईफेक करण्यात आली.
लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी समाज माध्यमात केलेल्या ट्विट मुळे बवाल
मात्र निखील वागळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी समाज माध्यमात केलेल्या ट्विटनंतर भाजपने या कार्यक्रमास विरोध केला. त्यांना या कार्यक्रमास पोलीसांनी देऊ नये अशी मागणी केली होती. पोलीसांनी या कार्यक्रमास सशर्त परवानगी दिली होती. दरम्यान कार्यक्रम सुरू होण्याअगोदरच भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने घोषणाबाजी केली.
या कार्यक्रमात आक्षेपार्ह भाषणे आणि वक्तव्ये करण्यात येऊ नये अशा पोलिसांनी सुचना देत त्याला परवानगी दिली. भाजपने कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर कॉंग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून या कार्यक्रमास पोलीसांनी सुरक्षा न पुरवल्यास आम्ही या सुरक्षा पुरवू अस म्हटले होते. कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा कार्यक्रम होण्यासाठी आपण सुरक्षा पुरवणार असल्याच म्हटले होते. त्यामुळे कार्यक्रमावेळी दोन्ही बाजुने कार्यकर्ते सामोरा समोर येऊन मोठा गोंधळ झाला.
पत्रकार निखील वागळे यांनी केलेल्या टविट बाबत भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. वागळे यांनी जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण होणारे वक्तव्य करून लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही अवमान केल्याचे देवधर यांनी तक्रारीत म्हटलं आहे. वागळे यांनी सोशल मीडियावर ‘एका दंगेखोराने दुसर्या दंगेखोराला दिलेला पुरस्कार’ अशा स्वरूपाचे लिखाण केले होते.
त्यामुळे वागळे यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारावी अशी मागणी देवधर यांनी केली. शहर भाजपनेदेखील वागळे यांच्या सभेला विरोध दर्शविला. ही सभा उधळून लावण्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला होता. सभेच्या ठिकाणी निषेध आंदोलन करण्याचेदेखील भाजपने जाहीर केले होते. त्यामुळे सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत परिस्थिती शांत केली.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…