पल्लवी मेश्राम, उपसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विदर्भ:- राज्यात आणि देशात अनेक बलात्कारी संत बाबा जेलची हवा खात असताना विदर्भातील बलात्काराचा आरोप असलेल्या एका नराधम बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अमरावती येथे आश्रमात वास्तव्यास असलेल्या एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या तिवसा तालुक्यातील मार्डी येथील भोंदू गुरूदास बाबाला अमरावती ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्याला मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील एका लॉजच्या बाहेर अटक करण्यात आली.
मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर येथील एका 35 वर्षीय महिलेने 25 जानेवारीला कुऱ्हा पोलिस स्टेशन येथे मार्डी येथील सुनील कावलकर ऊर्फ गुरुदासबाबा वय 47 वर्ष या भोंदूविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याच दिवशी दुसऱ्या एका महिलेच्या तक्रारी वरून त्याच्या विरूध्द विनयभंगाचा गुन्हा देखील नोंदविण्यात आला होता. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर नराधम बाबा गुरूदासबाबा हा पसार झाला होता.
त्यानंतर मागील अनेक दिवसापासून पोलीस नराधम बाबा गुरुदास याच्या शोध घेत होती. याच्या शोधासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार करून यवतमाळातील वणी, नागपूर, वर्धा येथील त्याचे आश्रमवजा घर तसचे मध्य प्रदेशातील काही ठिकाणी जाऊन आली. मात्र तो मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचा ठावठिकाणा पोलिसांना मिळत नव्हता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने गुरूदासबाबाच्या एका भक्ताच्या हालचालीवर लक्ष ठेवत मागोवा घेतला.
पोलिसाना या बाबत एक माहिती मिळून आली की, 8 फेब्रवारीला गुरूदासबाबा हा दिल्लीहून भोपाळला येत असल्याची माहिती त्याच भक्ताच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्याआधारे पथकाने गुरूवारी रात्री भोपाळ रेल्वेस्टेशनलगतच्या एका लॉजबाहेरून ताब्यात घेतले. ओळख पटविल्यानंतर एलसीबीचे पथक त्याला घेऊन शुक्रवारी अमरावतीत पोहोचले. येथे आणल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत तसेच चांदूर रेल्वेच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख किरण वानखडे यांनी त्याची चौकशी केली.
त्याला शुक्रवारी दुपारी तिवसा न्यायालयात हजर करण्यात आले. गरम तव्यावर बसून भक्तांना अश्लिल शिविगाळ करणाऱ्या भोंदू गुरूदास बाबाची चित्रफित गेल्या वर्षी मार्चमध्ये समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्यानंतर हा बाबा चांगलाच चर्चेत आला होता.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…
वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…
* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…