उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली/पुणे:- जिल्हातील मिरज येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका विवाहितेला रेल्वेत झोपेची इतकी मोठी किंमत मोजावी लागली की तिचं आयुष्य उदवस्त झाले.
पुणे येथून एक विवाहित महिला आई वडिलांना भेटण्यासाठी रेल्वेने कराडला जात होती. यावेळी या तरुणीला रेल्वेत झोप लागली. तिला कराडला उतरायचं होतं, मात्र झोप लागल्यानं कराड येऊन गेलं हे तिच्या लक्षात आलं नाही. त्यानंतर ती मिरज येथे पोहोचली आणि तिचा घात झाला.
मिरज येथून कराडला जाणारी गाडीला उशीर असल्याने ती रेल्वे जंगक्शनवर थांबली होती. त्यावेळी तिथे काही तरुणांनी तिला जबरस्तीने झुडपात ओढत नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नराधमांनी बलात्कार केल्या नंतर पीडित विवाहितेला रेल्वे ब्रीज जवळ असलेल्या कामगाराच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये कोंडून ठेवलं. त्यानंतर एका नराधमाने परत तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर नराधम आरोपींनी तिला कर्नाटक येथील जमखंडी इथे नेलं आणि तिला विकायचा प्लॅन केला. जमखंडी इथे पुन्हा आरोपींनी तिच्यावर बलात्कार करुन तिला 4 लाखांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आरोपींनी तिचे एका व्यक्तीची जबरदस्ती लग्न लावलं आणि त्या व्यक्तीकडून 4 लाख रुपये घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इथे मुलगी आली नाही म्हणून घरच्यांचा जीव कासाविकस झाला. त्यांनी पोलिसांकडे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
ज्या व्यक्तीला आरोपींनी विकलं त्यांनी या विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समजल्या नंतर त्याने पुन्हा मिरजेत ख्वाजा बस्तीजवळ तिला सोडून दिले. त्यानंतर पीडित विवाहित महिलेने तिथून थेट पुणे गाठलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या सर्व घटनेची तक्रार नोंदवली त्यानंतर ही खळबळजनक घटना समोर आली.
विवाहित महिलेने तक्रार दाखल करून पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन 7 संशयित तरुणांना अटक केली आहे. सरफू फकीर वय 20 वर्ष, संतोष बाबू वय 26 वर्ष, जुबेद वय 24 वर्ष, खालीद कोरबू वय 30 वर्ष, महंमदहुसैन वय 31 वर्ष, अबूजर जमादार वय 18 वर्ष, महंमद मुल्ला वय 20 वर्ष अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी अटक करुन सातही जणांना न्यायालयात हजर केलं. त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…