उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदार सुरतला गेले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माझा गेम करण्याचा आदेश दिला होता, असा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज येथे केला.
अकोल्यात पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी हा दावा केला. 20 जून 2022 ला एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून आमदारांसह सुरत गाठले होते. त्या आमदारांमध्ये बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा समावेश होता. मात्र, सुरतमध्ये नितीन देशमुख यांची प्रकृती अचानक बिघडल्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या. त्यानंतर देशमुखांनी शिंदेंची साथ सोडून ते उद्धव ठाकरेंकडे परतले.
शिंदे गटातील एका जवळच्या मित्र आमदाराने दिलेल्या माहितीनुसार आ. देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घोसाळकर यांच्या हत्येनंतर देशमुख यांनी आपला ‘गेम’ करण्याचे नियोजन होते, असा दावा केला. ते म्हणाले, सध्या सत्तेसाठी हे कुठल्याही थराला जाऊ शकतात. कोणाची हत्या करण्याचे काम पडले तरी ते करू शकतात. कुटुंबात दुफळी निर्माण केली जाते.
शिंदे गटातील एका जवळच्या मित्र आमदाराने दिलेल्या माहितीनुसार आ. देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घोसाळकर यांच्या हत्येनंतर देशमुख यांनी आपला ‘गेम’ करण्याचे नियोजन होते, असा दावा केला. ते म्हणाले, सध्या सत्तेसाठी हे कुठल्याही थराला जाऊ शकतात. कोणाची हत्या करण्याचे काम पडले तरी ते करू शकतात. कुटुंबात दुफळी निर्माण केली जाते.
मला शिंदे गटातील जवळच्या एका आमदाराने माहिती दिली. त्यांनी सांगितले की ज्यावेळी तुम्ही बंडादरम्यान सुरतला होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी गेम करण्याचे आदेश सुद्धा दिले होते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी मला हृदयविकाराचा झटका आल्याची खोटी बातमी प्रसारमाध्यमांना दिली, असा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…