अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
मो. नं. ९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ११ फेब्रुवारी:- शैक्षणिक वर्ष २०२३ या सत्रात झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत गोमुख विद्यालयातील एकूण ४७ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेत ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी एकूण २४ विद्यार्थ्यानी प्रावीण्य प्राप्त केले. विद्यालयातील कुणाल बंडूजी बल्की, सोनाली बंडूजी बल्की, रिया किशोर बावनकर, श्रुती अंकुश आसोले, दिव्यानी मोरेश्वर डाखोळे व भाग्येश्वरी धनराज मोवाडे या विद्यार्थ्यानी (अ) श्रेणीत प्रावीण्य मिळविले तर १८ विद्यार्थ्यांनी (ब) श्रेणीत प्रावीण्य मिळविले आहे. या परिक्षेतून इंटरमिजिएट पास झालेल्या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्ड परीक्षेत अनुक्रमे (अ) श्रेणीकरीता ७ गुण (ब) श्रेणीकरीता ५ गुण व (क) श्रेणीकरीता ३ गुण दिले जातात. तसेच १२ वी नंतर उच्च दर्जाच्या अभ्यासक्रमातील शिक्षणसुध्दा प्राप्त करता येते.
विद्यार्थ्यानी यशाचे श्रेय गोमुख विद्यालयातील कलाशिक्षक अमोल महाजन यांना दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्री. नेमराजजी मोवाडे सचिव प्रा.श्री. दिनकरराव जिवतोडे व मुख्याध्यापक श्री. महादेवराव खरबडे यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक व कला शिक्षकांचे अभिनंदन केले.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…