प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- माजी आमदार राजुभाऊ तिमांडे व विदर्भ विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ जवादे यांच्या नेतृत्वात तुळजापूर रेल्वे स्टेशन परिसरातील 25 गावाच्या विद्यार्थी यांचा रेल्वे मेल गाड्यांचा थांबाचा प्रश्न सुटावा म्हणून माजी आमदार राजुभाऊ तिमांडे व अनिल जवादे यांनी बेमुदत साखळी उपोषणाला दि.09 फेब्रुवारीला भेट दिली व पाठिंबा जाहीर केला आणि 25 गावाचा रेल्वे प्रवासाच्या प्रलंबित प्रश्न केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घेऊन हा प्रश्न आपण मिळून मार्गी लावू असे मत विदर्भ राज्य आघाडी चे जिल्हाध्यक्ष रामकिशोर रामाजी शिगनधुपे यांच्या सोबत चर्चा केली.
आज रविवार दिनांक 11 फेब्रुवारीला तुळजापूर रेल्वे स्टेशन इथून विदर्भ राज्य आघाडीचे शिष्टमंडळ व ग्रामस्थ घेऊन केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरीं यांची भेट घेतली व तुळजापूर रेल्वे स्टेशन परिसरातील 25 गावाच्या विद्यार्थ्यांच्या मेल गाड्यांचा थांबा संबंधित चर्चा करून सविस्तर माहिती दिली.
विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामकिशोर रामाजी शिगनधुपे यांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षापासून तुळजापूर रेल्वे स्टेशनला मेल गाड्यांचा थांबा मिळावा म्हणून भरपूर आंदोलने चर्चा बैठकी झाल्या परंतु तुळजापूर रेल्वे स्टेशनला थांबा मिळत नसुन फक्त सहानुभूती पत्र व आश्वासन मिळतं आहे.
करोनाच्या आधी तुळजापूर रेल्वे स्टेशनला मेल गाड्यांचा थांबा होता. करोना मध्ये गाड्यांचा थांबा बंद झाला परंतु कोविड परिस्थिती नॉर्मल झाल्यानंतरही गाड्या थांबा सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिस्थिती खराब होतं चाललेली आहे व आता लवकरच परीक्षा सुद्धा सुरू होणार आहे . तुळजापूर रेल्वे स्टेशन वरून 25 गावातील विद्यार्थी वर्धा नागपूर अमरावती या शहरांमध्ये उच्च शिक्षणाकरिता जातात. आणि
रेल्वे प्रवास हेच एकमेव साधन आहे. रेल्वे प्रशासनाने फक्त आश्वासने आणि सहानुभूती पत्र दिले परंतु गाड्यांचा थांबा सुरू अजूनही केला नाही त्यामुळे तुम्ही यामध्ये मध्यस्थी घेऊन लवकरच गाड्यांचा थांबा सुरू करावा अशी चर्चा करण्यात आली व माहिती दिली .
27 जानेवारी 2024 पासून तुळजापूर रेल्वे स्टेशन समोर बेमुदत साखळी उपोषण विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामकिशोर रामाजी शिगनधुपे यांच्या नेतृत्वात 25 गावातील ग्रामस्थ कामगार रेल्वे प्रवासी करत आहे .आज 16 दिवस पुर्ण होतील परंतु अजूनही वर्धा लोकसभा खासदार यांनी भेट सुद्धा दिली नाही आणि 25 गावातील विद्यार्थ्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबितचं आहे .
परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे.
तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून मा. गडकरी साहेब यांनी 25 गावातील विद्यार्थ्यांचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा असे शिष्ट मंडळ यांनी विनंती केली. याबाबत नितीन गडकरी यांना या विषयाच्या संबंधित माहिती असून सोळा दिवसापासून हे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे असं त्यांनी शिस्त मंडळाला सांगितले.
लवकरच प्रलंबित रेल्वे मेल गाड्यांच्या थांबाचा प्रश्न मी मार्गी लावणार व स्वतः रेल्वे मंत्र्यां सोबत, खासदार रामदासजी तडस साहेब यांच्या सोबत चर्चा करून हा प्रश्न लवकर मार्गी लावणार असे शिस्त मंडळाला गडकरी यांनी शब्द दिला.
यावेळी उपस्थित माजी आमदार राजु तिमांडे, अनिल जवादे, आशिष इंझनकर, ॲड.अरूण येवले, अरुण गावंडे, संदीप वाणी सरपंच, आतिश घूडे, मंगेश काकडे, सुनील जयस्वाल, राकेश उंरकांदे, भालेराव अडे ,स्वप्निल ठाकूर अजय राजूरकर, राहुल बैस श्रीराम पाटील, रमेश साळवे गजानन तिडके, भूषण कावळे सह शेकडो नागरिक उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…