सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार पुढाकारातुन पोलिसात तक्रार
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भामरागड;- येथील मणेराजाराम येथे शेतकऱ्यांचे धान्य खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणात लूट सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या धान्य खरेदी केंद्रा विरोधात शेतकऱ्यानं मध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. मणेराजाराम येथील अविका धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. त्यामुळे सामाजीक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या पुढाकाराने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की सामाजिक कार्यकर्ते यांनी 21 जानेवारी 2024 रोजी परिपत्रकाद्वारे जनतेला धान खरेदी केंद्रावर लूट झाल्यास काळविण्याचे आव्हान केले होते त्या अनुषंगाने मणेराजाराम येथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते ताटिकोंडावार यांच्या कडे आपली व्यथा मांडली व परिसरातील नागरिकांच्या विनंतीला अनुसरून ताटिकोंडावार यांनी आपली टीम घेऊन मणेराजाराम गाव गाठले व नागरिकांना विचारणा केली असता तेथील नागरिकांनी निडरपने सांगितले की आपली खरेदी केंद्रावर लूट होत आहे आम्ही अनेकवेळा व्यवस्थापकाला विचारणा केली असता आम्हाला उडवाउडवीची उत्तर मिळत होते.
ही समस्या ऐकून ताटिकोंडावार धान खरेदि केंद्रावर जाऊन संबंधितांना विचारणा केली की कश्या पद्धतीने धान खरेदी करता या वर संबंधितांनी आम्ही शासनाच्या धोरणाप्रमाणे 40.600 घेतो अशे उत्तर दिले. परंतु ताटिकोंडावार यांनी स्वत काही पोत्यांचे वजन केले असता 41.900 व 42.250 अशी शेतकऱ्यांची महालूट आढळून आली यावरून शेतकऱ्यांची गोणी मागे दोन ते अडीच किलो लूट दिसून आली म्हणजे सरासरी क्विंटलमागे 5 किलो संबंधिताला या विषय विचारणा केली असता कोणतेही उत्तर मिळाले नाही.
त्यामुळे सरपंच गाव पाटील व नागरिकांना घेऊन पोलीस स्टेशन गाठले व पोलीस स्टेशन मध्ये मनेराजाराम अविका धान खरेदी विरुद्ध तक्रार दाखल करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटिकोंडावार यांनी केली आहे. यावेळी पोलीस स्टेशननला तक्रार करताना सरपंच शारदा कोरेत इंदरशाह मडावी समवेत मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
शासन खरेदी केंद्र किंवा अभिकर्ता संस्थांकडून ओलाव्याची तुट गृहित धरुन ३८ किलो ५०० ग्रॅम वजन धानाचीच उचल करीत असल्याने शेतकऱ्यांकडून 41 ते 42.250 किलो प्रती गोणी (पोते) वजनाने केली जात असलेली खरेदी ही शुध्द लुट आहे: सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…