निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यातील गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत आहे उप्परवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या वेजबोर्ड कॉलनीत १० फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास घरफोडीची घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून 5 ते 6 चोरट्यांनी 2 घरातून सुमारे 25 तोळे सोन्याचे दागिने, 50 ते 60 हजार रुपये रोख आणि 2 ते 3 तोळे चांदीचे दागिने चोरून नेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. घरे चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरफोडी केली.
गडचांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र शिंदे यांची वर्धा येथे बदली करण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी येथील नूतन ठाणेदार राजकमल वाघमारे यांनी पदभार स्वीकारला आहे. घर फोडून या चोरट्यांनी नवीन ठाणेदाराला सलामी दिली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अंबुजा सिमेंट कंपनीने कामगारांसाठी भेणवी रोडवर कंपनीला लागून 50 ते 60 घरे बांधून ‘वेजबोर्ड कॉलनी’ असे नाव दिले. येथे कामगार अनेक वर्षांपासून कुटुंबासह राहत असून कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. हे कामगार मुलींच्या भावी लग्नासाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी दागिने खरेदी करण्यासाठी पैसे वाचवत असत. मात्र आता चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान गडचांदूर पोलिसांसमोर आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…