माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी’या घटना स्थळी धाव.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- तालुक्यातील नरसिहापल्ली येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नरसिहापल्ली येथे मध्यरात्रीच्या सुमारास कुटुंब गाढझोपेत असताना घराला भीषण आग लागली. काही क्षणात घराला आगीने कवेत घेतले. यात घरातील ३० क्विंटल कापूस जळून खाक झाला असून यात सुदैवाने कुटुंब थोडक्यात बचावले आहे.
नरसिंहापल्ली रवींद्रशंकर चेन्नुरी हे आपल्या कुटुंबासह झोपडीवजा घरात वास्तव्यास आहेत. १० तारखेला नित्याप्रमाणे जेवण करून कुटुंब झोपी गेले होते. मध्यरात्री अचानक घरातून आगीचे लोळ बाहेर पडण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता संपूर्ण घरात आग पसरली. यात वेचणी करून ठेवलेला ३० क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून खाक झाला आहे. त्यात संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घराची आगीत राख झाली. यात अडीच लाखांचा कापूससह घरात असलेल्या अत्यंत आवश्यक असलेल्या कागदपत्रे खाक झाली आहे.
या घटनेचे माहिती स्थानिक आविसं काँग्रेसचा पदाधिकारी कार्यकर्त्यांनकडून आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देतच तात्काळ अजयभाऊ कंकडालवार यांनी नरसिंहापल्ली येथील घटना स्थळी धाव घेतले आहे.
त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी घटनेचे माहिती जाणून घेऊन. दूरध्वनी द्वारे घटनेचे माहिती संबधित अधिकाऱ्यांना सांगून लवकरत लवकर पंचनामे करून. या परिवाराला शासन कडून मदत करण्यात यावी म्हणून सांगितले आहे. त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी चेन्नूरी कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूसाठी आर्थिक मदत केली आहे.
यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी, व्येकटापूर ग्रामपंचायतचे सरपंच अजय पोरतेट, उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायत माजी उपसरपंच कार्तिक तोगम, ग्रामपंचायत सदस्य ममिता कोरेत, चदृ मुळमेथे ग्रामपंचायत सदस्य सदस्य, तेराजना कुमराम माजी सरपंच, शामराव कुळमेते पोलीस पाटील, संजय पुरतेट माजी उपसरपंच राजाराम, लकमा सडमेक, तिरुपती दुर्गे, अंकुलू पानेम, सागर कुळमेते,सतीश पानेम, धनंजय भाऊ, मनोहर पागडे पोलीस पाटील, सचिन पांचार्यासह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…