प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.१६ फरवरी:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळाभाऊ उर्फ श्रीकांत मिरापूरकर यांच्या आदेशाने तथा राजेंद्र खूपसरे उपजिल्हाप्रमुख, सतीश धोबे तालुका प्रमुख, सतीश ढोमणे शहर प्रमुख यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
हिंगणघाट तालुक्यात दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोज रविवारला सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिके पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचे या रब्बी हंगामातील पिकांना जवळजवळ 90%टक्के इतका खर्च झालेला आहे. त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे. तसेच त्याचे शेतातील पिकांचे पंचनामे करून त्यांना शासनामार्फत तात्काळ मदत जाहीर करावी. याकरिता निवेदन देण्यात आले.
सध्या स्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे रास्त भाव मिळत नसल्यामुळे तो अडचणीत सापडला आहे. त्यावर निसर्गाची अवकृपा गारपिटीमुळे उरली सुरली सर्व आशा परस्त झाली आहे. महाराष्ट्रात सततच्या नापिकी व बाजार भाव कमी असल्याने शेतकऱ्यांचे खर्च निघत नसून शेतकरी हा कर्जात बुडत आहे त्याच्यावर कर्जाचे डोंगर उभा असल्याने त्याच्या समोर आत्महत्या कुठला पर्याय राहत नाही म्हणून या महाराष्ट्रात रोज आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे त्यातच या गारपिटीमुळे झालेले नुकसान त्याला न झेपणासारखे आहे म्हणून अजूनही आत्महत्या वाढतील यावर आळा घालण्यासाठी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना योग्य ती मदत जाहीर करावी असं निवेदनातून विनंती करण्यात येत आहे.
यावेळी निवेदन देताना उपतालुका प्रमुख प्रकाश अनासणे, नगरसेवक मनीष देवडे, शंकर मोहम्मारे, अनंता गलांडे, आशिष जयस्वाल, दिलीप चौधरी, दिलीप घुसे, गोपाल मेघरे, नितीन वैद्य, विनोद मोहोळ, अमोल मानकर, हिरामण आवारी, संजय सोनूरकर, भास्कर भिसे, अजय मानकर, प्रशांत कांबळे, रवी बागडे, सचिन धोटे, नीरज वाणे, चंदू भुते इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…