संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा १४ फेब्रुवारी:- स्पार्क जनविकास फाउंडेशन प्रणित युवा स्पार्कच्या वतीने ताडोबातील आगरझरी येथे आयोजित चार दिवसीय निवासी शिबिराचा समारोप नुकताच पार पडला.
युवा स्पार्कची नव्याने जबाबदारी सोपविण्यात आलेल्या शिबिरातील विद्यार्थ्यांनाच समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मान देण्यात आला. नव्याने जबाबदारी सोपविण्यात आलेल्या युवा स्पार्कच्या विदर्भ संयोजिका राधिका दोरखंडे, विदर्भ सहसंयोजक क्रांतिवीर सिडाम, चंद्रपूर जिल्हा संयोजक दर्शन मेश्राम, जिल्हा सहसंयोजिका नीकिता ठाकरे, गडचिरोली जिल्हा संयोजक प्रीतम बनकर मंचावर उपस्थित होते. शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेश खेरानी, मुक्त पत्रकार अविनाश पोइनकर, ऍड. दीपक चटप, आगरझरी निवासी संकुलाचे व्यवस्थापक अजय कोडापे यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.
सहभागी विद्यार्थ्यांनी यावेळी अनुभव कथन केले. सर्व विद्यार्थ्यांना युवा स्पार्कच्या वतीने प्रमाणपत्र आणि मेडलने सन्मानित करण्यात आले. वादविवाद स्पर्धेतील विजेते आशीष कारेवार, रोहित मेश्राम, शताक्षी खाडे यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या चार दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात विविध मान्यवरांनी व्यक्तिमत्त्व विकास, युवा नेतृत्व, सामाजिक कार्य आदी विषयांवर बौद्धिक मार्गदर्शन केले. प्राचार्य जयश्री कापसे गावंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, प्रा. दिलीप सोळंके, ज्येष्ठ दिग्दर्शक हरीश इथापे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, शिवाजी महाविद्यालय राजुराचे प्राचार्य डॉ. एस. एम. वरकड, उपप्राचार्य आर. आर. खेरानी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. पवन नाईक, राज्य पुरस्कार प्राप्त प्रा. गुरुदास बल्की, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राज्य अध्यक्ष बादल बेले, युवा राज्य अध्यक्ष बबलू चव्हाण, कोरपना येथील स्कॉलर्स अकॅडमीचे संचालक दिलीप झाडे, धनंजय तावाडे, संजय वैद्य, पक्षीमित्र सुमेध वाघमारे, इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे, ऍड. दीपक चटप, मुक्त पत्रकार अविनाश पोईनकर आदीचा मार्गदर्शकांमध्ये समावेश होता.
या शिबिरा दरम्यान विविध विषयांवर समूह चर्चा घेण्यात आली. सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनी आगरझरी गावात पथनाट्य सादर केले. गावातील रस्त्यावरील प्लास्टिक कचरा उचलून परिसर स्वच्छता केली. गावकऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले. यावेळी गावातील मुलामुलीनीही यात आपल्या कला सादर केल्या. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्पार्क जनविकास फाउंडेशनचे सर्व सदस्य, युवा स्पार्कच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…