मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जीर्ण इमारतीत रुग्णांची गैरसोय होत असल्याने परिसरातील दूरवरच्या भागातील आदिवासी बांधवांना सुसज्ज इमारतीतुन योग्य उपचार मिळावा या उदात्त हेतूने राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रयत्न करून तब्बल ७ कोटी रुपयांची निधी खेचून आणली.नुकतेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारत बांधकामाचे त्यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.त्यामुळे आता कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूप पालटनार आहे.
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त म्हणून कमलापूरची ओळख आहे.या परिसरात असंख्य खेड्यांचा समावेश असून या भागातील आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून १९८० मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली होती. ही इमारत अक्षरशः मोडकळीस गेली होती.जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतीतूनच रुग्णांवर उपचार केले जात होते.त्यामुळे मागील काही वर्षांपासून नूतन इमारत बांधकाम करण्याची मागणी केली जात होती.
मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी या बाबीची दखल घेऊन येथील नूतन इमारत बांधकामासाठी तब्बल ७ कोटी रुपयांची निधी खेचून आणली. तब्बल ४४ वर्षानंतर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे बांधकाम केले जाणार असल्याने आता या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने उदघाटन प्रसंगी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे गावात आगमन होताच त्यांचे ढोल ताश्यांच्या गजरात पुष्पगुच्छ देऊन गावकरांनी स्वागत करून आभार देखील मानले.
या भूमिपूजन सोहळा प्रसंगी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, राकॉचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे, डॉ. राजेश मानकर, माजी उपसरपंच शंकर आत्राम,विद्यमान उपसरपंच सचिन ओलेटीवार, श्रीधर दुग्गीरालापाटीवार, कृष्णा कीर्तीवार, सतीश दैदावार, संदीप रेपालवार, विनोद ओलेटीवार, वेंकटी उलेंदला, स्नेहदीप आत्राम तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भागातील नागरिकांना मिळणार लाभ
कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत रेपणपल्ली,दामरंचा, भंगारमपेठा,कोरेपल्ली,छलेवाडा ,गुडीगुडम,मोसम, मांड्रा, खांदला ९ उपकेंद्र आणि राजाराम येथील १ आरोग्य पथक समाविष्ट असून या प्राथमिक आरोग्य केंद्राची एकूण लोकसंख्या १९ हजार ४२६ एवढी आहे.उपकेंद्रात रुग्णांवर योग्य उपचार न झाल्यास कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागते.एवढेच नव्हेतर परिसरातील रुग्ण,आश्रम शाळेतील विध्यार्थ्यामुळे या ठिकाणी ओपीडी व्यतिरिक्त २४ तास उपचार केले जाते.सुसज्ज इमारत झाल्यास या भागातील रुग्णांना लाभ मिळणार आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…