भारतातील आर्य वैश्य कोमटी समाज हा व्यापारी दृष्टिकोन ठेवणारा आणि शांतीपूर्वक असलेला सक्षम समाज आहे
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आल्लापल्ली:- येते आर्य वैश्य कोमटी समाजच्या वतीने माता कन्याका परमेश्वरी देवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा अर्चना करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पौराणिक कथेनुसार एका विष्णुवर्धन राजाच्या वक्र दृष्टी त्याचा स्वाधीन न बडी पडता आपल्या लग्नाच्या दिवशी वधू, तिचे आई-वडील, तसेच सर्व 102 कुळातील समाजातील सदस्यांनी अग्निप्रवेश करून अग्निप्रवेशात उडी घेऊन आपला निषेध व्यक्त केला. माता वासवी चा पेनुगोंडा येथे शुद्धीकरण करून कुलस्वामी मानु लागले.
प्राचीन काळी आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात थानकुसा तालुक्यामध्ये ‘पेनुगोंडा’ नावाचे एक गाव होते. या गावामध्ये ‘वासवी’चा जन्म झाला. म्हणून हे श्री कन्यका परमेश्वरीचे जन्मस्थान पेनुगोंडा म्हणून ओळखले जाते. त्यावेळी पासून आर्य वेश्य कोमटी समाजाची आराध्य दैवत माता कन्यका परमेश्वरी आहे.
अल्लापल्ली येथे समाजातील 100 घर असून अनेकांना येथे मातेचा मंदिर बनावा असं वाटत होते. समाज बांधवांच्या अथक प्रयत्नातून माता वासावी चे कृपेने जागा प्राप्त झाली समाज भवन व मंदिर बनले. प्राण प्रतिष्ठा पहिल्या दिवशी श्रीराम मंदिरातून कन्यका मंदिरा पर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात आली यावेळेस गाजत वाजत फटाक्यांचा आतिषबाजी ने रॅली काढून मंदिरात रॅली पोहचली सायंकाळ ला मातेची मूर्ती आणि बालाजी, गणपती मूर्ती गंगा नदीतून आणलेल्या 2000 लिटर पाण्यात मूर्तीचे शुध्दीकरण केले दुसऱ्या दिवशी 3000 किलो तांदळात आणि 200 किलो फळांमध्ये ठेवले यात फुल व पुष्पहार चे स्वीकृती दिली. 3 दिवसीय चालणारे गणेश हवन, लक्ष्मी हवन, चंडि हवन, वासवी हवन करण्यात आले.
या प्राणप्रतिष्ठा पूजनासाठी कागजनगरचे प्रसिद्ध असलेले शर्मा महाराज यांना बोलवण्यात आले. त्यांचा सोबत ९ महाराज आले. यात समाज बांधव सहपरिवाराने शामील झाले.यात रोज भजन, कीर्तन व दांडिया नृत्य होते. यात महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम तसेच माजी पालकमंत्री अबंरीशराव आत्राम तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कृषी सभापती अजय कंकडालवार, माजी आमदार दीपक दादा आत्राम या मंगल प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थिती दर्शवून माता कन्याका परमेश्वरी देवी चे आशीर्वाद घेऊन सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिले.
या सोहळ्यात पाचही तालुक्यातून समाज बांधव हजारो संख्येने उपस्थित होते. या तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा मंगल सोहळा सर्वच समाज बांधवांना एकत्र येऊन हर्ष उल्हासाथ साजरी केली.अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना माजी समाज अध्यक्ष विजय विठ्ठल कोलपाकवार यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचं सत्कार रमेश शानगोनडावार यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले माजी पालकमंत्री अमरीशराव अत्राम यांचं माजी अध्यक्ष प्रशांत रागीवार यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केले. माजी आमदार दिपकदादा अत्राम यांचा सत्कार माजी अध्यक्ष विवेक चेलियालवार यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…