मंगेश जगताप, मुंबई विक्रोळी प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बंद दाराच्या आड भेट झाली आहे. भेट घेतल्याने आता या भेटीला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झालं आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती? याचा तपशील समजू शकणार नसला तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी निवडणूक लढवावी, असे आदेश भाजपच्या नेतृत्वाने दिले आहेत. मुख्यमंत्री व नारायण राणे यांची सह्याद्री अतिथि गृहावर बंद दाराआड भेट झाली आहे. ही भेट वैयक्तिक असल्याचं सांगितलं जात आहे.
शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादी महायुतीकडून नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी आता राणे यांना महायुतीच्या नेत्यांचीही मदत लागू शकते. शिवसेने कडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांचे नाव या लोकसभा मतदार संघासाठी यापूर्वी चर्चेत होतं. मात्र, आता या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कोकणाचा मोठा अभ्यास व मोठा संपर्क असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
हा मतदारसंघ सध्या ठाकरे गटाच्या ताब्यात आहे. विनायक राऊत हे या मतदारसंघाचे सध्या विद्यमान खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला ही जागा कोणत्या परिस्थितीत जिंकायची आहे, यासाठी तयारी सुरू झाली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून ही भेट असण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी वर्तवली आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…