प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा,दि.22:- तंबाखू नियंत्रण कायदा 2003 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सामान्य रुग्णालय, अन्न व औषधी प्रशासन विभाग तसेच पोलीस विभागाच्या सहकार्याने वर्धा शहरातील प्रमुख मार्गावरील वीस पान टपऱ्यांवर धडक कारवाई करुन 5 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला.
तंबाखू नियंत्रण कायदा 2003 नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व विक्री करण्यास बंदी आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम होत असून उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षघात, हृदयविकार, कॅन्सर यासारखे आजार होत आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामध्ये विविध रासायनिक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे या व्यसना पासून दुर राहणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलुजा, समुपदेशक राहुल बुचुंडे, सामाजिक कार्यकर्ता हर्षद ढोबळे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रफुल टोपले, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. गेडाम, अमित तृपकाने, पोलीस विभागाचे श्री. गायकवाड, पंकज भरणे, विजय गिरमकर यांनी ही कारवाई केली.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…