आशिष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येते एका मद्यधुंद महिला पोलिसाच्या कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत दोन तरुण जखमी झाले आहेत. नागरिकांनी महिला पोलिसाला थांबवत जाब विचारला असता महिला पोलीस कर्मचारीनेच उलटा रुबाब दाखवत तेथून पळ काढला. याप्रकाराबाबत रामनगर पोलीसांनी अपघाताची नोंद घेतली असल्याचे माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, एक पोलीस महिला कर्मचारी खासगी कारने एक पुरुष पोलीस कर्मचाऱ्या बरोबर जात होते. हे दोघेही दारूच्या नशेत मद्यधुंद होते. दारूच्या नशेत असलेल्या महिला कर्मचारीच्या हाती कारची स्टेअरिंग होती. वर्धा- आर्वी मार्गावरील अग्रगामी शाळेजवळ या मद्यधुंद महिला पोलीस कर्मचारीने एका दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही जण जखमी झाले. रितीक कडू, पवन आदमने अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पवन आणि रितीक हे दोघे दुचाकी मोटर सायकलने आर्वी नाक्याकडे जात होते. दरम्यान मागून येणाऱ्या MH 48 P 0864 क्रमांकाच्या कारने धडक दिली. या अपघातात रितीक कडू याच्या हाताला मार लागला, तर पवन आदमने हा किरकोळ जखमी झाला. अपघात होताच नागरिकांनी धाव घेतली असता स्टेअरिंग सीटवर गणवेशात महिला पोलीस दिसली.
यावेळी नागरिकांनी त्यांना हटकले असता महिला पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजले. इतकेच नव्हेतर मागील सीटवर एक पुरुष अंमलदारही मद्यधुंद अवस्थेत निपचीत पडून असलेला दिसून आला. नागरिकांनी त्यांना हटकले असता पोलिसी रुबाब झाडून तेथून पळ काढला. अपघात झाल्यानंतर तेथील नागरिकांनी महिला पोलीस कर्मचारीला हटकलं. घडलेल्या प्रकारबद्दल जाब विचारू लागले. त्यापैकी एकाने मोबाईलवर शूट करत मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यांचे वर्तन आपल्या कॅमेरेत टिपले. अपघात कसा कसा केला दारू पिवून कार कशी चालवता असा जाब शूट करणारा व्यक्ती त्यांना विचारत होता.
परंतु ड्रायव्हिंग सीटवर बसलेली महिला कर्मचारी नशेत इतकी तऱ्हाट झाली होती की, तिला काहीच बोलता येत नव्हतं. तिने काय केलं घडलं हेच तिला कळत नव्हतं. दरम्यान, याप्रकाराबाबत रामनगर पोलीसांनी अपघाताची नोंद घेतली असल्याचे माहिती आहे. सर्वसामान्यांना व्यक्तीला कायद्याच्या चौकटी सांगत गुन्हे दाखल केले जाते. मात्र या प्रकरणात दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…