अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- रा. सुं. बिडकर महाविद्यालय, हिंगणघाट आणि मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी समाजशास्त्र परिषदेचे 33 वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 16 व 17 फेब्रुवारी, 2024 ला रा. सुं.बिडकर महाविद्यालय, हिंगणघाट येथे संपन्न झाले. या परिषदेचा विषय “समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आधुनिक भारतीय समाजाच्या निर्मिती प्रक्रियेत महात्मा गांधीजींचे योगदान” हा होता. संपूर्ण अधिवेशन एकूण सात सत्रांमध्ये पार पडले.
या अधिवेशन उद्घाघाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. उषाकिरण थुटे उपस्थित होत्या. उद्घाघाटक म्हणून डॉ. प्रदीप आगलावे सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र व साधने समिती, महाराष्ट्र राज्य हे होते. तर विभागाचे आमदार समीर कुणावर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यासोबतच व्यासपीठावर बिजभाषक प्रा. डॉ. मैत्रेयी चौधरी, अध्यक्षा, अखिल भारतीय समाजशास्त्र परिषद दिल्ली, मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. राहुल भगत, कोश्याध्यक्ष डॉ. धनंजय सोनटक्के, सोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. राजूरकर, मराठी समाजशास्त्र परिषदेचे समन्वयक डॉ. आर. डी. निखाडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
मराठी समाजशास्त्र परिषदेची स्थापना १९८३ मध्ये करण्यात आली. परिषदेच्या स्थापने नंतर प्रत्येक वर्षी परिषदेचे अधिवेशन घेऊन या अधिवेशनात विविध विषयावर समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून चर्चा घडवून आणून समाजोपयोगी विद्यार्थीभिमुख संशोधनात्मक बाबीवर विचारमंथन घडून यावे या दृष्टीने विचारमंथन झाले. याच दृष्टीकोनातून मराठी समाजशास्त्र परिषदेचे अधिवेशन या महाविद्यालयात मराठी समाजशास्त्र परिषद व महाविद्यालय यांच्या संयुक्त विचारातून घेण्यात आले.
या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. शरद निंबाळकर, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ व माजी कुलगुरू, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी भारतीय आरक्षण धोरणाची वाटचाल आणि वर्तमान या विषयावर मार्गदर्शन केले. या अधिवेशनाच्या तिसऱ्या सत्रामध्ये डॉ. डी. श्रीकांत, सेवानिवृत्त प्राध्यापक, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस, गुजरात युनिव्हर्सिटी, अहमदाबाद यांनी सी पर्वतम्मा भारतातील पहिली दलित महिला समाजशास्त्रज्ञ यांच्या कार्य आणि कर्तुत्वावर प्रकाश टाकला. अधिवेशनाच्या चौथ्या सत्रामध्ये श्री. रमेश बिजेकर, समन्वयक, शिक्षण बचाव समिती, महाराष्ट्र यांनी नव्या शैक्षणिक धोरणाचे उच्च शिक्षणावरील परिणाम या विषयावर आपले विचार मांडले. पाचव्या सत्रामध्ये संशोधक प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी यांनी आपल्या शोध निबंधांचे वाचन केले. सहाव्या सत्रामध्ये डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अर्थशास्त्रज्ञ, माजी प्राध्यापक, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न व ग्रामीण भागातले मागासलेपण या विषयावर व्याख्यान दिले. सातव्या सत्रामध्ये मान्यवरांच्या हस्ते संशोधकांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरणा नंतर प्रा. पी. सी. वानखेडे यांनी मान्यवरांचे आभार मानून दोन दिवसीय मराठी समाजशास्त्र परिषदेच्या 33 व्या राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता केली.
या प्रसंगी डॉ. नारायण चौधरी, सेवानिवृत्त प्राध्यापक, य. च. म. मुक्त विद्यापीठ, नाशिक, मा. डॉ. संजय दुधे प्र-कुलगुरू, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर, डॉ. शाम खंदारे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, डॉ. बी. एम. राजूरकर, प्राचार्य, रा. सुं. बिडकर महाविद्यालय, हिंगणघाट, डॉ. राहुल भगत, अध्यक्ष, मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचा समारोपीय कार्यक्रम पार पडला.
उद्घाघाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. नीलिमा दवणे यांनी तर आभार डॉ. कमलकिशोर इंगोले यांनी मानले. मराठी समाजशास्त्र परिषदेच्या 33 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या सफल आयोजनामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…