हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहराजवळून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. शहरा लगत असलेल्या पहिल्या नाल्यावर आज सोमवारी दुपारी 1.00 वाजताच्या सुमारास दीनदयाळ वॉर्डातील मूळ रहिवाशी असणारे रामअवध चौहान व त्याची अर्धांगिनी शेळ्या चारत होते. या वेळी चौहान यांची पत्नी बाजूलाच असलेला चारा गोळा करीत असतांना झुडपात लपून बसलेल्या एका वाघाने महिलेवर झडप टाकून गळ्याला पकडून फरफरटत नेत असतांना पतीने आरडाओरडा केली. तेव्हा वाघाने महिलेला तिथेच टाकून जंगलात पळ काढला.
पत्नीचा ओरडण्याचा आवाज आल्याने पतीने घटनास्थळी जाऊन बघितले असता पतीच्या पाया खालची जमीन सरकली कारण त्याची पत्नी वाघाचा हल्ल्यात मृत अवस्थेत घटनास्थळी आढळून आली. यावेळी 60 वर्षिय मृतक लालबच्ची चौहान हिच्या गळ्याला वाघाने जबड्यात पकडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जाते.
वाघाच्या हल्ल्यात पत्नी मृत झाल्याची बातमी लगेच मृतक महिलेच्या पतीने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दिली. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. यावेळी नागरिकांनी या घटनेबाबत स्थानिक पोलिसांना व वनविभाग प्रशासनाला तात्काळ कळविले. दरम्यान मृतकाचे शव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना करिता पाठविण्यात आले आहे.
शहरातील नागरिकात वाघाची दहशत: ही घटना बल्लारपूर शहरा लगत घडल्याने बल्लारपूर शहरातील नागरिकात वाघाची दहशत पसरली आहे. वन विभागाने त्वरित पाऊले उचलून या वाघाचा बंदोबस्त करून त्याला कैद करून नागरिकांचे रक्षण करावे असे गावातील नागरिकांनी म्हंटले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…