अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- युवा उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत, बजाज ऑटो भारतीय युवा शक्ती ट्रस्ट, देशभरातील तरुणांना उद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन सहकार्य करून यशस्वी उद्योजकांचा गौरव संस्थे तर्फे केला जातो. यावर्षी राष्ट्रीय कार्यक्रम व प्रदर्शनी चे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले होते. या सोहळ्यात हिंगणघाट येथील शक्ती इलेक्ट्रिकल्सचे युवा संचालक स्वप्नील निमजे यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘एंटरप्रेनुअर ऑफ द इयर’ हा पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले.
यावेळी भारतीय युवाशक्ती ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी विश्वस्त लक्ष्मी व्यंकटेशन, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त आयएएस जी श्रीकांत यांनी आपला संघर्ष आणि भारतीय युवाशक्ती ट्रस्ट ला मिळालेल्या पाठिंब्याचे अनुभव व्यक्त केले. व्यासपीठावर बजाज ऑटो सीएसआरचे राष्ट्रीय सल्लागार सी.के. त्रिपाठी, औद्योगिक समूह बागलाचे अध्यक्ष उद्योगपती कागलीवाल, छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.श्रीकांत देशमुख आदीची प्रमुख उपस्थित होती.
सर्वसामान्य कुटुंबातील स्वप्नील निमजे याने शिक्षणानंतर ईलेक्ट्रीक व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्दोजक होऊन लोकांना रोजगार मिळवून दिला. या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील उद्योजक, मार्गदर्शक सहभागी झाले होते.
स्वप्नील निमजे यांनी एम.टेक पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले, एका कंपनीमध्ये नोकरीसाठी रुजू झाले. मात्र स्वतः काहीतरी वेगळं करून आपली ओळख निर्माण करण्याची तगमग स्वप्निल ला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात करून यशस्वी उद्योजक झाला. याची दखल घेत बजाज ऑटो भारतीय युवाशक्ती ट्रस्ट ने एंटरप्रेनुअर ऑफ द ईअर राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील यशोदाबाई निमजे पांडूरंगजी निमजे पत्नी सुविधा निमजे यांना दिले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन होत आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…