महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मध्य प्रदेश:- येथून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. येथील दिंडोरी येथून ही भीषण दुर्घटना समोर आली आहे. बारझार घाटात अनियंत्रित पिकअप व्हॅन दरीत कोसळून 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत. जखमींवर शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. गाडीचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुर्देवी घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. मृतांमध्ये 9 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त व्यक्ती एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमाही देवरी गावातून मसुरघुगरी परिसरात गेले होते. हा कार्यक्रम आटपून हे सर्व लोक गावी परत येत असताना बुधवारी रात्री दिंडोरी जिल्ह्यातील बडझर घाटात अचानक पिकअपचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाचे वाहना वरील नियंत्रण सुटले काही क्षणातच पिकअप गाडी 20 फूट खोल दरीत जाऊन उपटली. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी आरडा ओरड झाली. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्याशिवाय स्थानिकांनीही तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने दिंडोरी रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.तर जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…