प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सहाय्यक निबंधक श्री आर एन पोथारे यांचा सेवा निवृत्ती समारंभ कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड हिंगणघाट येथे कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंगणघाट बाजार समितीचे सभापती व अँड सुधीर कोठारी यांचे हस्ते सेवा निवृत्ती समारंभाचे सत्कारमूर्ती श्री आर एन पोथारे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था हिंगणघाट यांचे शाल, शिफळ, शिल्ड, साडी चोळी व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सहकुटूंब सत्कार करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती हिम्मतराव चतुर सभापती कृ उ बा स समुद्रपूर, हरिष वडतकर उपसभापती कृ उ बा स हिंगणघाट, दिगंबरराव चांभारे अध्यक्ष खरेदी विक्री संघ हिंगणघाट, राजु भोरे उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ हिंगणघाट, नरेंद्र थोरात अध्यक्ष मेहरबाबा पत संस्था समुद्रपूर, अमोल कसणारे संचालक स्व बापुरावजी देशमुख सूत गिरणी वर्धा, सौ योगीता सचिन तुळणकर नगराध्यक्ष नगर पंचायत समुद्रपूर तसेच हिंगणघाट बाजार समितीचे जेष्ठ संचालक ओमप्रकाश डालिया, उत्तमराव भोयर, अशोकराव उपासे, घनश्याम येरलेकर, पंकज कोचर व सर्व संस्थेचे संचालक मंडळ, नगर पंचायत समुद्रपूर चे नगरसेवक व संस्थेचे सदस्य गण तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सेवा निवृत्ती समारंभाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन हिंगणघाट बाजार समितीचे सचिव टी सि चांभारे व आभार प्रदर्शन समुद्रपूर बाजार समितीचे सचिव शंकरराव धोटे यांनी केले.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर…