आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हा गांधी जिल्हा की गावठी दारूचे माहेर, असा प्रश्न ठिकठिकाणी पाडणाऱ्या पोलिसांच्या धाडी व त्यात जप्त होणाऱ्या दारू साठ्यामुळे कुणासही पडावा. देशी विदेश दारूची अवैध वाहतूक करीत त्याची खुलेआम विक्री करण्याची बाब आता नित्याची ठरली आहे. तर थेट शिवारात गावठी दारूने उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. मात्र आता ही दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जीवावर बेतणारे ठरू शकते, असे उघडकीस आले आहे. अस्सल मोहाफूलची दारू किक देत नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने झटकेबाज दारू करणारी फॅक्टरीच उजेडात आली.
हिंगणघाट, वर्धा, देवळी, पुलगाव, समुद्रपुर तालुक्यात अनेक गावात दारूचे लोट वाहत आहे. ही गावठी दारू बनवताना अनेक विषारी पदार्थ त्यात टाकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या विषारी दारूमुळे अनेक परिवार उद्धवस्त झाले आहे.
वर्धा जिल्ह्यातील गणेशपूर, पांढरकवडा येथील पारधी बेड्यावर हा प्रकार उघडकीस आला. रेशिंदा उर्फ चंपी सखाराम फुलमाळी तसेच इंद्रपाल उर्फ इंद्रधनू राजू भोसले यांनी गावठी दारू निर्मितीचा कारखानाच उघडला होता. तशी माहिती मिळाल्यावर सावंगी पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी काही प्रमाणात मोहाफूल व उर्वरित बेशरमच्या झाडाचा विषारी पाला, बॅटरीच्या निकामी सेलमधील काळा भुरका, युरिया तसेच गूळ टाकून हा जिन्नस सडविला जात होता. नंतर तो मोठ्या ड्रम मध्ये उकळल्या जात असे. या दारूची नशा अधिक किक देणारी असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी हे सर्व साहित्य तसेच दारू नष्ट केली. या ठिकाणी सापडलेला एकूण ८७ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकारच्या दारूने जिल्ह्यात बळी दोनच दिवसापूर्वी नांदोरा शिवारात गावठी दारू जप्त करीत अमोल सुनील तुराणकर व अभिलाष डफरे यांना अटक करण्यात आली होती. करोना काळात बाहेरून येणारी देशी विदेशी दारू विकणे ठप्प पडले होते. तेव्हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करणारे अड्डे सूरू झाले होते. जंगलात आडवळणावर अशी दारू तयार केली जात होती. ते बंद करतांना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. करोना संक्रमण संपल्यावर परत बाहेरून दारू येणे सूरू झाले. त्यामुळे गावठी दारूचे अड्डे रोडावले. अजूनही ते सुरूच असल्याचे चित्र पुढे आले आहे.
रविंद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात…
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी दिल्ली:- भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी…
भंडारा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- राज्यात महिला मुलीवर अत्याचार हत्याच्या घटना…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्ह्यात आगोदरच कायदा व…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुणे जिल्हातून एक धक्कादायक…
*हजारोच्या संख्येने सहभागी झाले समाज बांधव* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. चामोर्शी-:…