ॲड. भूषण तायडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोला:- संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान आणि सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम दि.13 ते 30 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज(दि.13) कस्तुरबा गांधी रुग्णालय, अकोला येथे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून केला.
उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे यांनी निर्देश दिले की, आशा स्वयंसेविक, आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक यांनी घरोघरी भेटी देऊन क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्णांचा शोध घ्यावा. कुष्ठरुग्ण महिलांची आवर्जून तपासणी करावी. मोहिम यशस्वीतेसाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करावे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोलें यांनी शासनाच्या धोरणानुसार 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करण्याच्या दृष्टीने जबाबदारीने कार्य करावे, अशा सूचना दिल्या. मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वाना शुभेच्छा दिल्या. यावेळी मनपाचे प्रशासन उपायुक्त श्रीमती वंजारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष शर्मा, मनपा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, मेडिकल ऑफिसर कुष्ठरोग डॉ. संदीप बाबर, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. उपाध्ये आदि उपस्थित होते. तर जिल्हा क्षयरोग कार्यालय येथील वसंत उन्हाळे, शहर शहरोग उमेश पदमने बाबेरवाल, प्रतीक गाडगे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…