प्रदीप खापर्डे, तालुका नागभीड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागभीड:- शहरात रुख्मिणी सभागृहाच्या प्रांगणात आज बहुजन समाजातील नागरिकांकरिता जागतिक महिला दिनाचे औचित साधून राजे छत्रपती शिवाजी महाराज व फुले शाहू आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय प्रबोधनकार मी वादळवारा फेम अनिरुद्ध वनकर व सुप्रसिद्ध गायिका तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रं फेम कडूबाई खरात यांच्या शिवराय ते भिमराय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ.सतिश वारजुकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून संपूर्ण महापुरुषांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. अविनाश वारजुकर, सह उद्घाटक म्हणून महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. नामदेवराव किरसाण, ओबीसी संघटक महाराष्ट्र प्रदेश धनराज मुंगले, गडचिरोली जिल्हा कांग्रेस कमिटी अध्यक्ष महिंद्र ब्राम्हणवाडे, जेष्ठ नेते पंजाब गावंडे, जेष्ठ नेते गोविंद भेंडारकर, जेष्ठ नेते फ्रफुल खापर्डे, अनमोल शेंडे सर, दिगांबर गुरपूडे, प्रा. राजेश कांबळे, प्रा. जगनाडे सर, विनोद बोरकर, खोजराम मरसकोल्हे,गजाजन बुटके,डॉ. रवींद्र कावळे, प्रमोद चौधरी,विजय गावंडे, रमाकांत लोंधे,साईश वारजूकर,, पुरुषोत्तम बगमारे,विवेक कापसे,नैना गेडाम,नितुताई गुरपुडे, सुनिताताई डोईजड,माला मुळे,आशा गायकवाड,संपूर्ण सेलचे पुरुष /महिला /युवक कांग्रेस पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी डॉ.अविनाश वाजूकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आज भारतीय जनता पार्टी घाबरली असून त्यांना विरोधी पक्षातील नेत्यांची गरज भासत आहे. देशातल्या अनेक स्वायत्त संस्था हाताशी घेऊन विरोधी पक्षांतील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव केंद्रातील सरकार करीत आहे. समाजा समाजात द्वेष निर्माण करून हे सरकार सामाजिक असंतोष निर्माण करीत आहे. असे व्यक्त केले.
तर डॉ.नामदेव किरसाण यांनी देशातील अनेक संस्था अदानी व अंबानीला विकून त्यांना आर्थिक बळकट करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे देशात आर्थिक असमतोल निर्माण होत आहे. एकीकडे देश बळकट होत चालल्याचे सांगून दुसरीकडे ८० कोटी कुटुंबांना मोफत धान्य देत असल्याचे सांगून पाठ थोपटून घेत आहे हा विरोधाभास असून आज याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
डॉ सतीश वारजूकर यांनी आपल्या उदघाटनिय भाषणातून आज या देशात संविधान टिकवायचे असेल तर हे हुकूमशाहीचे सरकार घालून बहुजनांचे नवीन सरकार आणण्याची गरज निर्माण झाली आहे असे मत व्यक्त केले. तसेच येणाऱ्या निवडणुकीत यासाठी सर्व बहुजन समाजाने एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागभीड तालुका महिला अध्यक्ष सौ. प्रणयाताई गड्डमवार,यांनी केले तर प्रास्ताविक अध्यक्ष चिमूर विधानसभा युवक कांग्रेस रोशन ढोक यांनी केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…