अकोला जिल्ह्यात कलम 36 अन्वये स्थानिक अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान.

ॲड. भूषण तायडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी

अकोला,दि.14:- जिल्ह्यात दि. 18 ऑगस्टपासून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून घोषीत कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतीचे निवडणूकीचे मतदान रविवार दि. 18 सप्टेंबर तर मतमोजणी सोमवार दि. 19 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या कालावधीमध्ये शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे पेक्षावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना दि. 15 सप्टेंबरचे 20.00 वा.पासून ते दि. 22 सप्टेंबर 2022 चे 24.00 वा.पर्यंत जादा अधिकार प्रदान केले आहेत.

यात रस्त्यावरुन जाणाच्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोक अशा रितीने चालतील त्यांची वर्तणुक कशी असावी या विषयी निर्देश देणे. मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवून न देणे. अशा कोणत्याही मिरवणुका ज्या मार्गाने जाव्यात किंवा त्या मार्गाने जावू नयेत ते विहीत करणे, सर्व रस्त्यावर व नद्यांचे घाटावर आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे धूण्याचे, उतरण्याचे ठिकाणी जागेमध्ये देवालय किंवा इतर सार्वजनिक किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्यावे किंवा गाण्याचे किंवा ढोल, ताश, शिट्टया व इतर कर्कश वाद्य वाजविणे इत्यादी बाबत नियम तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा सार्वजनिक उपहाराच्या (अतिथीगृहाच्या) जागेत ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकर) उपयोग करण्याचे नियम करणे व त्यावर नियंत्रण करणे, सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमांचे कलम 33,36,37 ते 40,42,43 व 45 अन्वये कलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पूष्टी देणारे योग्य आदेश देणे इ. अधिकारांचा समावेश आहे. या आदेशाचे कोणीही, कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास पोलीस आधिनियम कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आदेशात नमूद केले आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

22 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

24 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago