प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती उपसा करून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असून त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल आणि पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कारवाई करण्यात यावी म्हणून पाऊले उचलली आहे.
अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी सर्व उपविभाग व तालुक्यात तपासणी नाका तसेच भरारी पथके स्थापन करण्यात आली असून हिंगणघाट व देवळी तालुक्यात अवैध वाहतुक करणारे टिप्पर जप्त करण्यात आले.
तहसीलदार हिंगणघाट यांनी भरारी पथकासमावेत राळेगाव ते अल्लीपूर मार्गावर अवैध रेती वाहतुक करणारे दोन टिप्पर जप्त करुन तहसील कार्यालय, हिंगणघाट येथे जमा करण्यात आले. तसेच यापुर्वी 6 टॅक्ट्ररवर कारवाई करुन जप्त करण्यात आले.
तहसीलदार देवळी यांनी भरारी पथकासमावेत देवळी ते आंजी मार्गावर आंजीजवळ रेती वाहतूक करणारे पाच टिप्पर जप्त करुन तहसील कार्यालय देवळी येथे जमा करण्यात आले. सर्व जप्त केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…