अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. ९८२२७२४१३६
सावनेर:- शहरात अनेकांच्या घरी फॉल्टी मीटर मुळे अवाढव्य वीज बिल येत असून हे मीटर बदलविण्याकरीता वीज वितरण अधिकारी संबंधित दुकानातून मीटर खरेदी करून आणण्यास सांगून मीटरचा काळाबाजार करीत आहे तसेच अर्धे वीज बिल भरणाऱ्याचाही विद्युत पुरवठा खंडित करीत असल्याने सावनेर शिवसेना व संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून हा काळाबाजार त्वरित थांबवा. अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करू या आशयाचे निवेदन कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.
सावनेर शहरातील नागरिकांनी अनेक दिवसापासून फॉल्टी मीटर बदलून देण्यासाठी वीज वितरणास अर्ज केला अर्ज केला अाहे.परंतु वीज वितरण कंपनी मीटर भाडे, अधिभार, आकार लावीत ग्राहकाचे बिले वाढविण्याचे कार्य सुरू केले आहे. त्यामुळे अनेक नागरिक अनेक वर्षापासून त्रस्त आहे.बिल कमी आले पाहिजे म्हणून ग्राहकांनी चायनामेड लाईट सुद्धा वापरणे सुरू केलेले आहे .तरी वीजबिलात फरक पडलेला नाही.उलट वितरण कंपनीने आपले रेट वाढविले असल्यामुळे ज्या ग्राहकांना पूर्वी ३०० रूपये बील यायचे त्या ग्राहकांना आता ८०० रुपये बिल येत आहे.यामुळे नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त बोजा पडलेला आहे.
त्यात विद्युत वितरणाद्वारे रिडींग न घेता अंदाजे बिल पाठवित असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहे.याची तक्रार नागरिकांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडला केली.यावर सेना आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून कर आकारणी व मीटर भाडे घेत असल्याने नागरिकांचे मीटर, वीज वितरणाने स्वखर्चाने बदलून द्यावे.
अंदाजे बिल पाठविण्याची प्रथा बंद करावी आणि अर्धे बिल भरणाऱ्याचा विद्युत प्रवाह खंडित करू नये अन्यथा शिवसेना संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने आंदोलन करेल व निर्माण होणाऱ्या परिस्थितीला वीज वितरण कंपनी जबाबदार राहील या आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष दिनेश इंगोले, शिवसेनेचे सावनेर शहराध्यक्ष सुभाष मछले, दशरथ मतेल, दिलावर शेख, चंदू पुरे, सुधाीर वानखेडे, किशोर चनेलिया, सुधाकर ढोबळे, सुधाकर तीबोले, गणपती पन्नामी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…