या कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ. दीप्ती कैलासपंत इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील देसाईगंज येथे आज दिनांक ८ मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दीक्षाभूमी देसाईगंज येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. दिप्ती कैलाशपंत इंगोले व प्रमुख पाहूण्या डॉ. सुचिता तुकाराम पेद्दीवार सहाय्यक प्राध्यापक मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालय देसाईगंज, सखी मंचच्या कल्पना कापसे आणि बार्टीच्या समतादुत डॉ. वंदना घोंगडे यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी पाहुण्यांचे व समितीच्या जेष्ठ सदस्या श्रीमती रत्नमाला बडोले व यशोदाबाई मेश्राम यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. त्यानंतर मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलित करून मानवंदना
घेण्यात आली. याप्रसंगी जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाईंच्या प्रतिमांचे पूजन करून स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या शेवटी संगीत खूर्ची चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीच्या सचिव ममता जांभूळकर यांनी केले तसेच संचालन ममता रामटेके यांनी तर आभार सरिता बारसागडे यांनी मानले. या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समितीच्या अध्यक्षा कविता मेश्राम व उपाध्यक्षा श्यामला राउत, गायत्री वाहने, लीना पाटील आणि सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या सहभागी सभासद यांनी मोठया प्रमाणात परिश्रम घेतले व या वेळी महिला मोठया प्रमाणात उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…