विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारी शाळा. परिश्रमाने केलेल्या कार्याची फलश्रुती: नलीनी पिंगे
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा,10 मार्च:- “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या उपक्रमात बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेला राजुरा तालुक्यातून पहिला क्रमांकाचा मान मिळाला. तालुक्यातील अनेक शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.
यावेळी उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, स्काऊट मास्तर बादल बेले यांच्या मार्गदर्शनात शिक्षक -शिक्षिका ज्योती कल्लूरवार,रोशनी कांबळे, रुपेश चिडे,वैशाली टिपले, जयश्री धोटे, सुनिता कोरडे, अर्चना मारोटकर यांनी शालेय परिसरात विद्यार्थी-पालक यांच्या सहकार्याने परसबाग, माजी विद्यार्थी संघ, शाळा मंत्रिमंडळ, राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट-गाईड युनिट, आरोग्य तपासणी, विविध क्रीडास्पर्धा, शैक्षणिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्मिती, शोषखड्डा, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, बचत बँक, गांडूळखत निर्मिती, तसेच मासिकपाळी, स्वयंरक्षण, योगा, कौशल्य विकास, हातधुण्याचे प्रात्यक्षिक , शालेय पोषण आहार, वाहतूक नियम, शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय परीक्षा यावर मार्गदर्शन व चर्चा आयोजित केल्या.
यावेळी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच लक्ष पुढे ठेऊन या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. तालुक्यातून पहिला क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेचे संचालक तथा माजी आमदार ऍड. संजय धोटे, अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबनानी,सचिव भास्करराव येसेकर, सह सचिव शंकरराव काकडे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार,संचालक लक्ष्मण खडसे, अविनाश निवलकर, मधुकर जाणवे, मंगला माकोडे आदींनी अभिनंदन केले. शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी यांच्या समन्वय व परिश्रमामुळे हा क्रमांक आला असून वेळोवेळी जिल्हा व तालुका स्तरातून अधिकारीवर्ग यांचे मिळालेले मार्गदर्शन अतिशय महत्वाचे ठरले. तसेच परिश्रमाने केलेल्या कार्याची फलश्रुती झाल्याचे मत मुख्याध्यापीका नलीनी पिंगे व पर्यवेक्षक बादल बेले यांनी व्यक्त केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…