कोरपना तालुका अध्यक्षपदी अजय गिरडकर तर सचिवपदी स्वप्नील ताडुरवार, उपाध्यक्षपदी दीपेश वनकर
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे अंतर्गत राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती तालुका कोरपना ची नुकतीच कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र देशकर, जिल्हा उपाध्यक्ष, चंद्रपूर, अनंत डोंगे, तालुका अध्यक्ष राजुरा, बबलू चव्हाण, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष, विजय पचारे, जिल्हाध्यक्ष, वन्यजीव संवर्धन समिती, रवी बुटले, तालुका संघटक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कोरपना तालुका नवनियुक्त कार्यकारणी मध्ये अजय पंढरीनाथ गिरटकर अध्यक्ष, दीपेश रामकृष्ण वनकर उपाध्यक्ष, स्वप्नील गजानन ताडूरवार सचिव तर संघटक म्हणून सागर रमेश बावणे, मनीष प्रमोद पिंपळकर, प्रणीत रमेश निवलकर, दिपक प्रकाश देवकते, धम्मदीप रामचरण मेश्राम, अजयकुमार परमात्मा राम, रोहित भास्कर दुरुतकर , राजू सुनील मेश्राम आदींची निवड करण्यात आली.
यावेळी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, उपाध्यक्ष प्रा. दीपक भवर, सचिव सचिन वाघ, महाराष्ट्र महिला अध्यक्षा डॉ. प्रीती तोटावार, उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे, प्रकाश कदम, सचिव बापू परब, आशिया रिजवी, नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर, विलास कुंडोजवार, रत्ना चौधरी, जिल्हाध्यक्ष मोहनदास मेश्राम, संदीप आदे तसेच संस्थेच्या पदाधिकारी यांनी केले.
राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती मार्फत परिसरातील वन्यजीवांचे संरक्षण करणे, मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे, साप व मानव यातील संघर्ष टाळणे, सापांना सुरक्षितपणे पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे, पशु-पक्षी यांचे जतन करणे, वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या सोबत सहकार्य करीत जनजागृतीपर उपक्रम राबविणे आदी कार्य केले जाणार आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…