आदर्श शाळेत जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 9 मार्च:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुराच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शोभा उप्पलवार यांचा शॉल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भास्करराव येसेकर हे होते. तर सत्कारमूर्ती म्हणून शोभा उपल्लवार यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून मधुकरराव जाणवे, संचालक, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट मास्तर बादल बेले, जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार,स्काऊट मास्तर रुपेश चिडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी शालेय स्तरावरील वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच पद्ममापुर येथे झालेल्या जिल्हा स्काऊट-गाईड मेळाव्यातील सहभागी विद्यार्थीना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षिका अर्चना मारोटकर यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका नलीनी पिंगे व आभार स्काऊट मास्तर रुपेश चिडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता स्काऊट-गाईड, राष्ट्रीय हरित सेना व शाळेतील इतर विद्यार्थी, शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले.
शोभा उप्पलवार वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपले नावलौकिक केले असून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम करून आई-वडील, शाळा शिक्षकांचे मानसन्मान वाढवावे. आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जात स्वतः ची व देशाची प्रगती साधावी असे प्रतिपादन यावेळी शोभा उप्पलवार यांनी केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…