अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १० मार्च:- स्थानिक लायन्स क्लब मार्फत नुकतेच महाशिवरात्री निमित्य श्रीशंकर देवस्थान वाकोडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त मंडळाचे देविदास मदनकर तर सचिव अतुल बांगरे आणि प्रा.विलास डोईफोडे, अध्यक्ष लायन्स क्लब यांची विशेष उपस्थिती होती.
सदर शिबिरामध्ये मधुमेह, रक्तचाप, हृदयरोग, अस्थमा, नेत्ररोग, दंतसमस्या, नाक, कान, घसा इत्यादीची तपासणी करून गरजूना औषधी वाटप सुद्धा करण्यात आले. उपरोक्त तपासन्यांकरिता अमेय हॉस्पिटलचे डॉ. परेश झोपे, पुण्यानी हॉस्पिटलचे डॉ. शिवम पुण्यानी व डॉ. स्वाती पुण्यानी, आदित्य हॉस्पिटलचे डॉ. अमित बाहेती, आस्था पाथोलॉजि लॅबचे डॉ. प्रवीण चव्हाण तसेच नेत्रतंत्रज्ञ रुकेश मुसळे यांचे मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभले.
मानवसेवा हीच ईश्वरसेवा असून ताण,तणावाच्या या युगात सर्वांनी नियमित आरोग्य तपासन्या कराव्यात असे प्रा.डोईफोडे यांनी प्रतिपादन केले. या शिबिरात दीडशेच्या वर भाविकांनी आणि ग्रामीण जनतेने शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरा करिता आवश्यक संपूर्ण औषधे प्रवीण टोणपे, किशोर सावल, रुपेश जिवतोडे यांनी प्रायोजित केले होते.
या कार्यक्रमाचे संचालन रुपेश मदनकर, प्रास्ताविक वत्सल बांगरे चार्टर प्रेसिडेंट तर आभारप्रदर्शन हितेश ठक्कर यांनी केले. आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोशन भिलावे, वैभव नागपुरे, हितेश पटेल, सुशांत घटे, मनोज पटेल, चित्रा चकोले, ऋषभ कुमेरिया, प्रमोद चव्हाण, भूषण आवारी, शिव ठाकरे, मिलिंद पंडिया,राखी महानंदे, कुणाल भोपे आदींनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी नागरिकांनी लायन्स क्लबच्या सामाजिक उपक्रमांची मुक्तकंठाणे प्रसंशा केली.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…