प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- रेल्वे कवठा येथे ग्रामवासी तसेच गावातील सर्व बौद्ध बांधव स्वतः पडीत अवस्थेत असलेल्या शासकीय इमारत व खाली जागा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे वाचनालय सुरू करण्याबाबत सदर निवेदन ग्रामपंचायत कवठा रेल्वे यांना दि.15 फेब्रुवारी 2024 ला दिले असून त्यावर ग्रामपंचायत द्वारा ठराव मंजूर न करून सरपंच आपली मनमानी दाखवत आहे.
याकरिता वाचनालय न झाल्यास शिक्षणा अभावी समस्त ग्रामसेवक कवठा रेल्वे गाव सोडून मंत्रालयाकडे जाणार वाचनालयाच्या मागणी करिता भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांच्या नेतृत्वात आज उपजिल्हाधिकारी फुलजले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थितीत सागर मराटे, जिजाबाई सरोदे, गीता मून, वर्षा गंगावन, पुष्पा तुपे, रोशनी खंडे, रत्नमाला कोडे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी निवेदन दिल्यानंतर सर्व सांगितले की, रेल्वे कवठा गावात विद्यार्थ्यांकरिता एकही वाचनालयाची व्यवस्था आतापर्यंत नाही आहे व ग्रामपंचायतची आरोग्य केंद्र लागून असलेली मागील वीस वर्ष त्याहुनी अधिक वर्षापासून पडीत अवस्थेत असलेले शासकीय इमारत व खुली जागा आहे आम्ही सर्व ग्रामवासी तसेच गावातील सर्व बौद्ध बांधव स्वतः या जागेची पुनवृत्ति करून या पडीत असलेल्या इमारतीचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यकर्ता उपयोग करून या जागेवर विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेतले जाऊ शकतात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे वाचनालय सुरू करण्याचा निर्धार केला आहे तसेच संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिबिंब असलेले पंचशील ध्वज वाचनालया समोर साकारण्याची इच्छा आहे.
गावातील विद्यार्थ्यांना व युवांना शैक्षणिक आत्मिक विकासाकरिता प्रोत्साहित करेल व बौद्ध समाजाचा भावनेला आदर मिळेल या विषयाची मागणी आम्ही मागील पाच वर्षापासून सतत मौलिक रूपाने करीत आहोत आम्हाला आतापर्यंत फक्त आश्वासन देण्यात आले आहे सामाजिक कार्य ज्याच्यामुळे गावातील विद्यार्थी व युवकाचा मानसिक शैक्षणिक विकास होईल या जनहित कार्य आपण सहयोग द्याल अशी आशा बाळगतो तसेच या कार्यास आपले व शासनाचे सहकार्य व आपल्या द्वारा शासकीय नियमांनुसार आपण जागेची पाहणी करून त्याबद्दलचा ठराव मंजूर करून समस्त ग्रामविकांना विद्यार्थ्यांना सहकार्य कराल.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…