उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- संस्थापक बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात (भारतीय बौद्ध महासभा) च्या वतीने संरक्षक महाउपासिका मिराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गद्शनाखाली त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांचा १२६ वा जयंती महोत्सव मंगळवार दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी ०४.०० ते १०.०० वाजेपर्यंत डॉ.आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता रोड दादर मुंबई येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ. हरिष रावलिया ट्रस्टी चेअरमन, कॅप्टन प्रविण निखाडे ट्रस्टी, एस. के. भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष, डॉ. जगदीश गवई राष्ट्रीय उपाध्यक्ष, सुषमाताई पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष, सी. बी. तेलतुंबडे राष्ट्रीय कोषाध्यक्ष, ॲड. डाॅ. एस. एस. वानखडे राष्ट्रीय सचिव/केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख, बी.एम.कांबळे राष्ट्रीय सचिव, रागिनी पवार, केंद्रीय सदस्य, भारतीताई शिराळ, महिला विभाग सचिव डी. एम. आचार्य, भिकाजी कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, रविंद्र इंगळे संरक्षण सचिव महाराष्ट्र राज्य, स्वाती शिंदे, महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुनंदा वाघमारे कोषाध्यक्ष, स्वाती गायकवाड संस्कार उपाध्यक्ष, वैशाली अहिरे अध्यक्ष मुंबई प्रदेश महिला शाखा, उज्वला खरात, सरचिटणीस, दिप्तीताई लोखंडे कोषाध्यक्ष डॉ. कौतिक दांडगे, संचालक महाराष्ट्र बाजारपेठ उपस्थित होते.
यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा केंद्र महाराष्ट्र राज्य पुरुष महिला पदाधिकारी, मुंबई प्रदेश पुरुष महिला पदाधिकारी, समता सैनिक दलाचे पदाधिकारी व सैनिक, बौध्दाचार्य केंद्रिय शिक्षक शिक्षिका, माजी श्रामणेर, झोन क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि 6 चे पुरुष महिला पदाधिकारी मुंबई सर्व वार्ड, नगर शाखांचे पदाधिकारी, तुतारी वाले, डॉ. आंबेडकर भवन येथील हाॅलचे व्यवस्थापक हजारो नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम मगरे अध्यक्ष मुंबई प्रदेश यांनी भुषविले, या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविंद्र गवई सरचिटणीस मुंबई प्रदेश यांनी केले यावेळी विलास खाडे, कोषाध्यक्ष, विलास ढोबळे संस्कार उपाध्यक्ष, सुनील बनसोडे, उपाध्यक्ष प्रचार पर्यटन विभाग आणि सर्व मुंबई प्रदेशचे पदाधिकारी हे मंचकावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात आदर्शाची पुजा आणि सामुदायिक त्रिसरण पंचशीलाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी वरिष्ठांच्या हस्ते बौध्दाचार्या श्रामणेरी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्र बाजारपेठ आयोजित स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सोन्याची नथ, सेमी पैठणी, ज्वेलरी सेट आणि उत्तेजनार्थ बक्षीस डॉ बाबासाहेब आंबेडकर चांदीची प्रेम, लकी ड्रॉ महिला/पुरुषांना पैठणी आणि सुट लेंथ देण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष रेखाताई ढेकळे यांनी घेऊन सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या. या कार्यक्रमाच्या शेवटी सरण्णत्तय होऊन कार्यक्रम संपन्न झाला.
भारतीय बौध्द महासभा मुंबई प्रदेश यांच्या वतीने वेळी कार्यक्रमाचे आयोजन केले. त्या त्या वेळी सर्वांनी उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वांचे मुंबई प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने शतशः आभार मानले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…