प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सहायता संघ हिंगणघाट तर्फे जागतिक महिला दिनाचा सोहळा केजीएन हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सहायता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष (शिक्षा विभाग) सुनील पिंपळकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणुन राष्ट्रीय प्रभारी तसेच राज्य अध्यक्ष रवि धारने, राज्य महिला अध्यक्षा हेमलता धारने, राज्य उपाध्यक्षा चंदाताई येलेकर, सुलभा देशमुख, अशोक पडगीलवार व्यासपिठावर हजर होते.
विशेष मार्गदर्शक म्हणुन अनिकेत दिवे, जगदिश वांदिले, सुलभा इंदुरकर मंचावर हजर होत्या. तसेच ह्या कार्यक्रमामध्ये सत्कार मूर्ति सौ. विजया हटवार, सौ. निलिमा डफरे, सौ. पुसनाके, सौ. करुणा मुसळे यांनी केलेल्या चांगल्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सोहळा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सहायता संघाच्या उपाध्यक्षा सौ. चंदाताई येलेकर यांच्या नेतृत्वामधे पार पडला.
यावेळी सौ. चंदाताई येलेकरनी आपल्या प्रस्ताविका मधून संघाचा वार्षिक अहवाल सादर केला. ह्या कार्यक्रमासाठी सकाळ पासुनच मानवाधिकार सहायता संघाच्या सर्व महिला पदाधिकारी खुप उत्साही होत्या. पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुन्यांनी आपल्या भाषाणातून महिला वर्गच सशक्तिकरन, स्वयंम उद्योजिका आणी आत्मनिर्भर कसे बनता येईल याचे धडे दिले.
ह्या कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मानवाधिकार सहायता संघाच्या महिला पदाधिकारी कल्पना हिवंज, विद्या गिरी, माधुरी मालेकर, कु. वनिता पराते, सुरेखा देशमुख, सुजाता जांभूळकर, सिमा तिवारी, दिपाली आदेवार, मुक्ता मडावी, सीमा मख, शितल तिवारी, ज्योती धोपटे, शीतल शेंडे, रुपा चौधरी, शैला हटवार, ज्योषणा बावणे, शिला आदेवार, वैशाली गुळघाने, गीता मेश्राम, संगीता डुकरे, जयश्री भगत, सुनीता सेनाड, सिमा रंगारी, मंजुषा वैरागडे, वृंदाताई बारहाते, कल्पना भेंडे, सीमा आडे, कोमल निवल, कू.ज्ञानेश्वरी शेंडे, भारती वैद्य, शिला राजुरकर, संगीता डुकरे, संगीता पुरी, सुजाता नगराळे, संगीता पुरी, मीनाक्षी फुलबांदे, प्रणिता तपाशे, वैशाली ठाकरे, शीतल शेंडे, ममता मेघरे, स्वाती उरकुडे, किरण गाढवे, कविता घोडे, ज्योती वर्गणी, मेघा घिन्मिने, कल्पना वघळ, श्रावणी वघळ, विद्या टिपले, ऋषाली टिपले, इंदिरा तडस, सरिता लड़ी, संगीता भोयर, वनिता सातघरे, सीमा गाडे, वैशाली बावणे, अरुणा माहुरे, ज्योष्णा जांभूळकर यांनी भरपुर सहकार्य केले. या संपुर्ण कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कार्याध्यक्षा वैशाली ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. संगीता डुकरे यांनी केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…